प्रतिनिधी :- दादाजी बागुल
यवतमाळ- बिरसा क्रांती दलाच्या वतीने यवतमाळ जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ,(बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष) म्हणून बोलत होते. या आढावा बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. नारायनराव पिलवंड,
(राज्य प्रशिक्षक बिरसा क्रांती दल )मा. वसंतराव कनाके,राज्य संघटक, मा.अनिल पेंदोर जिल्हा उपाध्यक्ष,मा.प्रभात कनाके , मा.मारोती गव्हाळे जिल्हा उपाध्यक्ष,मा.रमेश भिसनकार, जिल्हा उपाध्यक्ष, नागोराव गेडाम,जिल्हा सचिव, उपस्थित होते.
सर्वप्रथम महानायक रावण, बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, बिरसा क्रांती दल प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा केली. प्रत्येक गावात बिरसा क्रांती दलाची शाखा स्थापन करून त्यांना या विचार प्रवाहामध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न करणार असे मनोगत तालुका अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या आढावा बैठकीमध्ये यवतमाळ जिल्ह्याची कार्यकारणी मध्ये खालील मान्यवरांना समाविष्ट करून घेण्यात आले.
*नवनियुक्त पदाधिकारी बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा*
1.संजय मडावी ,जिल्हा महासचिव
2.प्रकाश ढगे ,जिल्हा संघटक
3.रमेश भिसनकार-जिल्हा उपाध्यक्ष
4.मारोती तुकाराम गव्हाळे-जिल्हा उपाध्यक्ष
5.रवी नारायण खाकरे-तालुका महासचिव ,नेर
6.जगत राजाराम चव्हाण-तालुका उपाध्यक्ष,यवतमाळ
7.अजाबराव मारेकर,तालुका उपाध्यक्ष,यवतमाळ
8.सचिन देवरावजी कुमरे,तालुका सचिव ,यवतमाळ
9.गणेश सहदेव धुर्वे,तालुका संघटक,यवतमाळ
10.मंगेश भानुदास पोयाम,शहर अध्यक्ष,यवतमाळ
11.मुकेश शेषराव चांदेकर,सचिव,यवतमाळ तालुका
12.सचिन प्रकाश कदम,शहर उपाध्यक्ष,यवतमाळ
13.महादेव रमेश आत्राम,अध्यक्ष,चाणी कामठवाडा
14.महेश गुणवंतराव घोडाम,प्रसिद्धी प्रमुख,चाणी कामठवाडा
15.सुनिल महादेव अंबुरे,अध्यक्ष ,वागद,दारव्हा
16.भारत संतोष अंबुरे,अध्यक्ष,तोरणाळा,दारव्हा
17.आशिष देवीदास कडाम,अध्यक्ष,कोटंबा
18.प्रविण भिमराव धुर्वे,सचिव आर्णी तालुका
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरसा क्रांती दलाचे महासचिव संजय मडावी यांनी केले. या आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न करणारे बिरसा क्रांती दल यवतमाळ तालुक्याचे अध्यक्ष मेजर जीवन कोवे,अतुल कोवे,शरद मडावी यांनी प्रयत्न केले .कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार रमेश मडावी ,जिल्हा संघटक यांनी मानलें.




0 Comments
जय आदिवासी
जय जोहार