आज अदानी सारख्या महाकाय नी बलाढ्य भांडवलदार व त्यांना सत्तेची संपूर्ण ताकद पुरविणाऱ्या सत्ताधाऱ्यांसोबत निकराची लढाई लढताहेत तें आदिवासी

By आदिवासी युवा




🔳 आज अदानी सारख्या महाकाय नी बलाढ्य भांडवलदार व त्यांना सत्तेची संपूर्ण ताकद पुरविणाऱ्या सत्ताधाऱ्यांसोबत निकराची लढाई लढताहेत तें आदिवासी ---- 


▪️ डॉ.संजय दाभाडे (Sanjay Dabhade) , पुणें , 9823529505


▪️ शनिवार , ६ नोव्हेम्बर २०२१ 


▪️ ज्या कुणाला हवामान बदलाच्या संकटाची थोडीही जाणीव असेल , ज्या कुणाला जल -जंगल -जमिनी नी आदिवासींच्यावर अदानी सारख्या भांडवलदार व सरकार ह्यांच्या कडून होणाऱ्या विध्वंसाचे भान असेल त्यांनी जरूर बघावं आदिवासी देशभरात किती विपरीत स्थितीत संघर्ष करताहेत. 


 संपत्तीचे भुकेले अजस्र्र भांडवलदार नी त्यांच्यासाठी पायघड्या घालणारी सरकारे ह्यांच्याविरोधात संविधानिक चौकटीत आदिवासींचे तीव्र लढे देशभरात ठिकठिकाणी सुरू आहेत.


अनेकांना वाटतं कि आदिवासी संघर्ष करत  नाहीत , पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे.


 आदिवासींचे लढे मुख्यतः जल- जंगल -जमिनी साठी व बाहेरील शोषणकर्त्या घुसखोरांच्या ( डिकू  ) पासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी सतत सुरूच आहेत.


 मध्य भारत तें एकूण आदिवासी क्षेत्रात हें लढे जल -जंगल -जमिनी साठी तर उत्तरं पूर्व राज्यांत प्रामुख्याने स्वायत्तते साठी सुरु राहिले आहेत.


  आजही गडचिरोतील सुरजागड नी छत्तीसगड च्या हंसदेवः इथं आदिवासींचे शांतीपूर्ण व संविधानिक चौकटीत लढे सुरु आहेत. संविधानातील अनुसूची पांच व अनुसूची सहा , जंगलं हक्क कायदा , पेसा कायदा ह्याच्या बळावर आदिवासी अविरतपणे लढताहेत.


 अदानी सारखे भांडवलदार त्या त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांच्या साथीने आदिवासींचे लढे चिरडून टाकण्याचा प्रयत्न करताहेत. 


  हें संघर्ष आदिवासींच्या अस्तित्वासाठी , जल -जंगल- जमिनी वाचविण्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी ठरणार आहेंत. 


▪️ डॉ.संजय दाभाडे (Sanjay Dabhade) , पुणें , 9823529505

     sanjayaadim@gmail.com

Post a Comment

0 Comments

झाले