जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी बिरसा क्रांती दल संघटनेच्या दिंडोरी तालुका वतीने करण्यात आली.




प्रतिनिधी :- दादाजी बागुल


नाशिक-१५  नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी होते आहे.जननायक बिरसा मुंडा यांचे राष्ट्र व समाजाप्रती असलेले निस्वार्थी समर्पण व बलिदान पहाता त्यांना "भारतरत्न"प्रदान करण्यात यावा,अशी मागणी भारताचे पंतप्रधान/केंद्र सरकारला, बिरसा क्रांती दल दिंडोरी तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार दिंडोरी तालुका यांच्या मार्फत देण्यात आले. 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांची भूमिका महत्त्वाची आहे. समग्र स्वतंत्रता समर यांचा समन्वय बिंदू जननायक बिरसा मुंडा हे संपूर्ण राष्ट्र- समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. इतिहासात जननायक बिरसा मुंडा हा असा नायक होता ज्याने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या क्रांतीकारी विचाराने आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून एका नव्या सामाजिक आणि राजकीय युगाची सुरुवात केली.जननायक बिरसा मुंडा यांनी काळया कायद्यांना आव्हान देऊन बर्बरतेच्या ब्रिटिश साम्राज्याला कंठस्नान घातले.पराक्रम आणि सामाजिक प्रबोधनाच्या जोरावर बिरसा हे खऱ्या अर्थाने तत्कालीन काळातील एकलव्य होते.


आदिम संस्कृतीची खिल्ली उडवणे बिरसा यांना सहन होत नव्हते. त्यांनी अंधश्रद्धाळू ढोंगीपणा चे खंडन केले आणि लोकांना हिंसा आणि मादक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्याकाळी निष्पाप आदिवासींना अधिक त्रास देण्याचे काम इंग्रजांनी आणि सावकारांनी, जमीनदारांनी,जहागीरदारांनी केले.  या विरोधात अवघ्या २५ वर्षीच्या अल्पशा आयुष्यात बिरसा मुंडा यांनी उठाव केला आणि शेवटच्या श्र्वासा पर्यंत लढा दिला. 





आदिवासी समाजावरील होत असलेल्या अत्याचारा विरूद्ध लढा देत मजलूम आदिवासींना प्रोत्साहन देऊन त्यांचे पाणी,जमिन आणि जंगल वाचविण्यासाठी संघटितपणे काम करणाऱ्या बिरसा मुंडा यांना भारतरत्न सन्मान पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती पंतप्रधान/केंद्र सरकार यांना दिंडोरी तालुका तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले 


यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष मा अशोक जाधव उपाध्यक्ष मा शंकर वासले संघटक भिमराव चव्हाण,शाम खराटे, नंदू खराटे, सुनिल देसोडे,बबन गवळी इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले