दफनभूमी मंजूर व्हावी यासाठी आदिवासी एकता परिषद मार्फत तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन

By आदिवासी युवा


दफनभूमी मंजूर व्हावी यासाठी आदिवासी एकता परिषद मार्फत तहसीलदार शिंदखेडा यांना निवेदन


शिंदखेडा  🚩9/11/2021 रोजी आदिवासी एकता परिषद 🚩 शिंदखेडा. येथील भिल्ल समाज दफनभूमीसाठी तहसीलदार साहेब शिंदखेडा यांना निवेदन  देण्यात आले.  


शिंदखेडा येथील बंगला भिलाटीसाठी  दफनभूमी मंजूर व्हावी यासाठी आदिवासी एकता परिषद शिंदखेडा व 🏹आदिवासी भिल्ल🏹 समाज बांधव बंगला भिलाटी यांच्यामार्फत आदिवासी भिल्ल समाज जाती रिवाज प्रमाणे दफन करतो पण ती जागा आज पावत नावावर नसून भविष्यात आमच्या आदिवासी समाजाला अंत्यविधि ( दफन) करण्यास अडचण निर्माण होईल. 


म्हणून आपणास विनंती करीत आहोत की आम्हाला आमच्या दफनभूमीची जागा मंजूर करण्यात यावी यामुळे "आमची संस्कृती" टिकून राहील व आम्ही आदिवासी भिल समाज बांधव शासनाचे ऋणी राहिल. 


आता आदिवासी युवा फ़ेसबुक व टेलीग्राम  वरही उपलब्ध खालील लिंक वर क्लिक करा व आदिवासी युवा सोबत अपडेट रहा


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva




Post a Comment

0 Comments

झाले