By आदिवासी युवा
एसटीचेचक्र थांबल्याने भाऊबिजेस बहीन भावाची ताटातुट राज्य सरकारवर सामाजिक संघटनाचा रोष.
एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (८नोव्हे) एसटी कर्मचारी वाहन चालक यांच्या संपाने जन-जीवन नव्हेच महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी,सांस्कॄतीप्रधान राज्यात भाऊबंदकी सारखे नाते ताटा तूटीची वेळ आल्याने समाजात सेवेचे कार्य करणार्या सामाजिक संघटणांनी रस्त्यावर उतरून मत प्रदर्शन करित एसटी कर्मचारी यांना जाहीर समर्थनात आज दिलेल्या भेटीत सुरेशकुमार पंधरे अध्यक्ष नँशनल विश्वगामी जर्नालिष्ट फेडरेशनअंतर्गत ह्यूमन राईट्स संघटन व सरपंच परिषद, बिरसा फाईटर्स विदर्भाचे वतीने सविस्तर मत मांडतांनी पुढे पुरातनकाला पासून एसटी ही ग्रामीनांची जीवन वाहीनीचे चक्र बंद असल्याने जनजीवन तथा विद्यार्थी,येजा,शिक्षण व्यवस्था व सांस्कॄतिक कार्यक्रम रुढी,परंपरे वर याचा जबरदस्त परिणाम पडल्याने झाडीपट्टीतील भाऊ- बिज,निमित्यमंडईक, कार्यक्रमावर पडल्याने, पुन्हा जीवन गती थांबली आहे.
एकीकडे एसटी महामंडळातील कर्मचारी संपकरीत ठाम बसले आहेत .सरकारमध्ये एसटी व कर्मचारी यांचे विलीनीकरण व्हावे व ईतर शासकीय योजना,त्यांच्या सोयीसुविधा त्यांना भेटावा म्हणून
ते दि २८ आँक्टो पासून आज ११ व्या दिवसापर्यंत अजून परिवहन मंञी यांचा कुठलाही निर्णय न आल्याने सरकारवर अंकूश(तोल) असणारे आगारात फिरकुन पहात नसल्याने महाराष्ट्र सरकार(मुख्य) कारभारी व एसटी महामंडळांचे विलीनीकरण अंधातरीच राहणार का ? हा यक्षप्रश्र समाजसेवक व विचारवंताना पडलेला आहे
आतापर्यंत दुखी ३५ कर्मचार्यांनी आत्महत्या करून सरकारवर दबाव आणल्याचे जानवत नाही इतकी निष्ठूर सरकार व तेथील अध्यक्ष महोदय व मायबापांनी पुढे येवून काहीतरी निर्णय जाहीर करावा पुर्वीच पेट्रोल वाढीमुळे जेष्ठ नागरिक व दुचाकी वाहन धारकांची ताराबळ उडलीआहे. ऐन दिवाळीत व नंतरचे दिवस लाँकडाउन सारखा देखावा दिसत असल्याने लोक रस्त्यावर आप आपल्या ईष्टमंडळी आप्तेष्ठाकडे जाण्यासाठी सैरावैरा आहेत वर्णन करावा तेवढे शब्दच अपुरे आहेत रोज एसटी महामंडळातील कर्म चारी संपकरी आत्महत्या हे२०२१ वर्ष देशासाठी महामारीच नव्हेतर संपकरी कुटुंबासाठी भय घेवून आले आहे ? त्याचा अंत मागण्या मान्यकरून चतुर्थ कर्मचारी सेवेत घ्यावे असे आव्हानवेळी याप्रसंगी साकोली आगारातील कर्मचारी व डीएम गौतम शेंडेजींना भेटून केले
यावेळी संतोष मडावी,अरविंद भाऊ,खोब्रागडे,विनायक पराते, एकनाथ शहारे,रामेश्वर शहारे,पांडू हटवार,शंकरजी पर्वते,पांडूरंगजी मेश्राम,हितेश कंगाले,विलास गेडाम,विजू आखरे,शंकर वघारे, ऋषीकेश धमगाये,महिला वाहक लक्ष्मी रंगारी ,पुजा पुस्तोडे,रेखा झोडे,रत्ना कुंभरे,कविता मडावी, वैशाली डोंगरे,शोभाबाई समरित होत्या तसेच आत्महत्याग्रस्त सत्यजित ठाकुर यांना श्रध्दाजली वाहण्यात आली व एसटीच्या सरकार विरोधी धोरणाचा विरोध दर्शविण्यात आला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार