By आदिवासी युवा
बागलान तालुका व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील व वघाणे पाडा येथे आदिवासी व गोरगरीब मुलांसोबत दीपावली साजरा करण्याची एक संकल्पना मनात ठेवून वघाने पाडा येथे आम्ही भेट दिली व त्या गोरगरीब मुलांसोबत एक तास व्यतीत करण्याचा प्रयत्न केला.
आमच्या संकल्पनेत एक छोटीशी कमतरता ठरली कारण आम्ही जेव्हा त्या गावात गेलो तेव्हा आम्ही सोबत फक्त फराळाचे सामान घेतले होते परंतु तेथील परिस्थिती पाहून आमच्या कडून काहीतरी उणीव काही तरी कमी झाल्याची जाणीव झाली,ते असे की एवढ्या मोठ्या सणाला तेथील काही चिमुकल्यांच्या अंगात नवीन तर सोडा पुर्ण कपडे सुध्दा नव्हते आमच्या मनात खुप खटकले व तेव्हा आम्ही ठरवले की पुढच्या वर्षी फराळासोबत कपडे ही आणायचे.
हे लिहायचे किंवा दाखवायचे कारण देखावा करायचा नसुन एक आत्मपरीक्षण करण्यासाठी आहे की आम्ही आमच्या स्वतःसाठी दिपावली साजरा करताना किंवा कोणताही उत्सव साजरा करतांना कोणतीही कमी राहु देत नाही मग अशा बांधवांच्या बाबतीत हि आम्ही काहितरी करण्याचा एक प्रयत्न करावा हाच एक उद्देश आहे.
ह्या संकल्पनेत मोलाचे सहकार्य लाभले ते जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.श्रीकृष्ण पारधी साहेब व बागलाण तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख मा.श्री.जितेंद्र बापु सुर्यवंशी यांच्या मुळे त्यात सहकार्य लाभले श्री.तारीक शेख,शिवसेना शहर प्रमुख नामपुर,श्री.सतीश कापडणीस,पत्रकार द्याने,श्री.केदाबापु सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य नामपुर,मोसम प्रतिष्ठाणचे श्री.सुनिल निकुंभ, पोलीस कर्मचारी मा.श्री.सुनिल पाटील,बिलपुरी चे बापु पवार, आबासाहेब पवार,संदीप बेडसे, रंभा बेडसे, अशोक (बाबा) ठाकरे, नवल ठाकरे,रोहन सोनवणे,व शिवसेना नामपुर बागलाण, मोसम प्रतिष्ठाण नामपुर

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार