By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
संघटणांनी कायदेशिर लढाईत पक्षाची पर्वा न करता निर्भयपणे उलगुलान करीत अन्यायी व्यवस्थेशी लडावे.बिरसा फायटर्स विदर्भ
सन २०२१ च्या जनगणनेत समाज बांधवानी धर्मकोड ७ काँलममध्ये धर्म 'आदिवासी ' लिहावा मेळाव्यात सुरेशकुमार पंधरेचे यांचे प्रतिपादन
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो च़िफ
साकोली (२६) १४६ व्या बिरसा जंयतीचे अौचित्य साधून समाज बांधवानी भिवसनटोला / जांभळी येथे,शहीद क्रांतीवीर ,संविधान जन्मदिन साजरा करण्यात आला तसेच २६/११च्या दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली वाहून समाजप्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बि एस सयाम नँ आ पि फेडरेशन तथा मा अध्यक्ष प्र समिती भंडारा उद्घाटक नंदुभाऊ समरित माजी जि प सदस्य शेतकरी नेते, ध्वज रोहक बि डी खांडवाये अध्यक्ष साकोली AIEF, सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसाफायटर्स विदर्भ विभाग, छायाताई पटले अध्यक्ष काँग्रेस महिला ता कमेटी, धर्मराज भलावी अध्यक्ष, NAPF भंडारा जनार्धन पुरामकर अध्यक्ष Napf, केशव भलावी सदस्य आ.समिती भाऊराव कुंभरे, सदस्यआ.समिती भंडारा, सरपंचा भिमावती पटले जांभळी दिनेश कटरे उपसरपंच मालुटोला, भारत मुगंमोडे, तंमुस अध्यक्ष, सत्यपाल गणवीर, पोपा , उमराव पंधरे , गणेश खंडाते, मा सरपंच, खंडाते सर, मंचकावर ग्राम पंचायत सदस्या हजर होते.
कार्यक्रमात समाज बांधवाना उद्बोधनात्मक बोलतांनी सुरेशकुमार पंधरे यांनी , समाज हिता बरोबर संविधानिक लढाई करतांनी तळा गळातील जनतेस न्यायासाठी निपक्षपणे व निस्वार्थी सेवा देण्याचे महत्वपुर्ण संघटनेचे कार्य असतात. समाज संघटणा व अभ्यासू, विचारवंत, तनमनधनाने परिपुर्ण लोकच करू शकतात.
अन्यायाची चीड असणार्यांनी संघटण शक्तीपणाला लावा असे मार्मिक मार्गदर्शनपंर संबोधन देतांनी सरकार व विरोधी पक्ष व समाजविरोधी कार्य करणारांना महाकाय' डायनोसॉरचा'उदाहरण देवून एकमेका विरूध्दात लढण्या पेक्षा,बांधवानी ऐक्यवाद शक्तीतून संघटीत होवून दाखवावा तरच अन्यायी व्यवस्था घाबरेल तसीच ताकद डायनोसॉरने लढतांनी दाखविली नाहीतर त्याचे जसे अस्तित्व,नष्ट झाले तसे व्हायला वेळ लागणार नाही.
असे आज समाजबांधवासमोर प्रण घेतानी म्हटले की निसर्गातील मोहाचे वॄक्ष तटस्थ राहून जीवनाश्यक फळ व फुले देतो म्हणुन त्याला कापता येत नाही व विकता येत नाही ते अस्तित्व आपणच जपु शकतो. त्याची निसर्गपुजक आदिवासी प्राचीन काळापासून पुजा,संवर्धन करीत आलेला आहे.त्या महावॄक्षा सोबत आदिवासी बांधवाचे ऐक्य व स्नेहाचे नाते जपले आहे,म्हणुन त्या झाडाबरोबर,समाज संस्कॄती चे संवर्धन होईल तर आदिवासी जगेल.व आरक्षण वाचेल म्हणुन सरकारी व्यवस्थेला घाबरून चालणार नाही स्वंयचलीत नेते निर्माण करा तरच न्याय मिळेल नाहीतर विनाराम कापगते निलज सारखे आदिवासीच्या ७/१२ वर अतिक्रमण करतील अशा पक्ष व जातीवाद्यांना समाजकटंक नेत्यांना आदिवासी शिर्ष नेतॄत्वाने शिक्षा द्यावी व मी स्वता आ.नाना पटोलेना पञ लिहून अशा भ्याड विचारसरणीच्या इसमाचा न्याय व हक्क व बिरसाच्या जल जमीन जंगल संकल्पणेतून खरा हरिश्चंद्र राखडू परतेकी आदिवांची बंधुची मेहनतीची जागा हडपणारांस बिरसा फायटर्स आंदोलन करेल व येत्या निवडणुकीत आदिवासी समाजानी धडा शिकवावा असा निर्भीड ,सज्जड इशारा आपल्या भाषणातून दिला.
कारण सदर अशोक विनाराम कापगते इसम हा राजकीय पक्षाचा असून वन- हक्कसमिती अध्यक्ष अाहे.पदाचा दूरूपयोग करित त्याने खोडतोड करीत अतिक्रमण फाईलवर व केशमध्ये हरिश्चंद्र' गोंड 'ऐवजी आई बोगस आदिवासी 'अनुसया विनाराम कापगते हीचे सातबारा वर नाव नोंद केले हे सत्य आहे.हे सर्व कागजाद आशिष मडावी ता अध्यक्ष युवा एबीएव्हीपी मोर /अर्जूनी यांनी मला कागजाद पोष्र्ट केले आहेत.तेच सत्य मी जनते समोर मांडणार व अन्याला वाचा फोडणारअसे सांगितले .
याप्रसंगी संचालण छगण पंधरे, प्रस्ताविक खंडाते सर,व समारोप भारतजी मुंगमोडेनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार