By आदिवासी युवा
बिरसा फायटर्सतर्फे नवनियुक्त सदस्यअध्यक्ष यांना प्रदेशअध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांच्या शुभेच्छा
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (४नोव्हें) आदिवासी उप योजना क्षेञातील योजनांचा तथा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्पस्तरिय नियोजन आढावा समितीवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन मंञालयाचे आदेश पञ दि ३ नोव्हे २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आले.
त्यात अध्यक्ष मा.अशोक श्रावण उईके आदिवासी सेवक पुरस्कॄत व सदस्या पैकी प्रभा चमरू पेंदाम, तुमसर,केशव तेजराम भलावी,भाऊराव कुभंरे साकोली, अजाबराव बुधा उईके, पराग कुमरे ,भंडारा भोला उईके लाखनी अशा सात अशासकीय सदस्याची निवड करण्यात आली.
यांची फोन काँम्फ्रंस व व्हाट्सअप फोनवर चर्चा करून त्यांना पुढील भविष्य वाटचालीस शुभेच्छा देत बिरसा फायटर्स व संपर्क प्रमुख महाराष्ट्र तर्फे दिपोत्सवनिमित्य व भाऊबिजेच्या निमित्य अभिनंदन केले,यात सदर समिती नव्याने नियुक्तीमुळे ,आदिवासी ,अनुशेष ,भरतीवर संवाद मागासलेले नेतॄत्व यात सुरू असलेला संघर्षावर प्रकाश पाडून ,खावटी १००% अनुदान योजना व कित्येक अनेक विकासात्मक योजना राबवून सर्व जिल्हा वासीयांना कशा मिळतील लक्ष वेधण्यासाठी चर्चा करून यात शैक्षणिक,धार्मिक,सामाजिक राजकीय ,धेय धोरण समाजाचे व अस्तित्वासाठी संविधानिक रुपाने मिळालेले अधिकाऱ व हक्क याची जाणीव सरकारी यंञणेवर ताबा मिळवून अमंञबजावणी करण्या साठी प्रयत्न करावे व समाजहित जोपासावी अशी यावेळी सुरेश कूमार प़ंधरे समन्वयक ,सरपंच परिषद मुंबई यांनी नवनियुक्त अध्यक्ष व स्नेही अशोक उईकेंजी शी सोबत हितगुज केले.
यावेळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व अभिनंदन केले परंतू यात पुन्हा जर मोहाडी,पवनी,लाखांदूर तालुक्यांना प्रतिनिधीत्व प्राप्त झाले असते तर अतिशय उत्कॄष्ठ व समाजाच्या समस्यावर जास्त लक्ष केंद्रित करता आले असते परंतू तसा समन्वय कदाचीत साधण्यात अपयश आले.
तरी पक्षाने व पक्ष संघटण वाढीसाठी समाजाचा हित पुढे ठेवून काम केले तर आदिवासी विकासाचे नियोजन आढावा घेऊन चळवळ उभी करावी ,आजचा रोष लक्षात घेत समाजााला विकास प्रवाहात आनुन बोगसगिरी कमी करावीत असी इच्छा आकांशा समाजाच्या आहेत.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार