By आदिवासी युवा
शिवभोजन थाली देणार गोरगरिब आमगाव वासीयांना दिलासा -बिरसा फायटर्स विदर्भ प्रांताध्यक्ष यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
आमगांव:(१नोंव्हे.) दि ३१/१० /२१ ला दिवंगत लोहपुरुष सरदार पटेल मा गॄहमंञी भारत यांची जयंती व इंदिरा गांधी आर्यन लेडी पंतप्रधान यांचे संयुक्त स्मॄर्ती दिनी आमगांव कुंभारटोली आयोजित शिवभोजन कार्यक्रमाचे उदघाटन आमदार व जनजमाती कल्याण समिती सदस्य आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते व शंभु प्रसाद शुक्ला यांचे अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला.
प्रमुख उपस्थीती संजय बहेकार,छबुताई उके,यादवराव भोयर विदर्भ सल्लागार बिरसा फायटर्स,लोकेश अग्रवाल, भैय्या लाल बावणकर,इंजिनीयर रामटेके राजकुमार फुंडे,हंसराज जोशी, उपस्थीत होते.
संचालन-महेश उके,यांनी तर समारोप आभार प्रदर्शन रामेश्वर शामकुवर यांनी मानले.
कार्यक्रमापंसंगी सांगतांनी सदर योजना शिवकालीन राज्य व्यवस्थेत राजा जनतेचा पालन कर्ता असल्याने त्या्चे पालन पोषण करने सरकार व हुकमत गारांचे कर्तव्य होते तेव्हा राज्य कोषागारमधून धन गोळा करून आपातकालीन परिस्थीतीत जनतेला योजनेचे रुप देवून सदर योजना गरिबापर्यंत पोहचवत आहे
या माध्यमातून सरकार व त्यांचे जनप्रतिनिधी जनजनगण पर्यंत सदर शिवभोजन थालीच्या माध्यमातून काम हाती घेवून शिवशाहीचे खर्या अर्थानं कार्य करित आहे.असे फोन काँम्फंसवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून फोनवर बिरसा फायटर्स प्रतिनिधी यादव जी भोयर गटशिक्षणाधिकारी व कार्यकर्यात्यासह विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी स्वर्ग.इ़ंदिराजी गांधीच्या स्मॄर्ती निमित्य व अौचित्य साधून एक मानवता म्हणून आँनलाईनवर बोलतांना मत व्यक्त केले.
आपण लवकरच.१५ नोव्हेबर १४६ व्या बिरसामुंडा जयंतीपासून लोहारा तालुका तिरोडापासून गोंदिया जिल्हा व भंडारा खावटी प्रश्नावर विना विलंब वाटपासंबंधी चर्चा करून सरकार व प्रतिनिधींना जाब विचारू असे म्हटले.
ऑनलाइन आयोजित मीटिंग मधे राकेश सोयाम,विदर महानिरिक्षक,भोजराज उईके, जिल्हाध्यक्ष कान्हा कुंजाम,पीबी कंगाले सर भंडारा हजर होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार