By आदिवासी युवा
औरंगाबाद आज दि.25/11/2021 वार :- गुरूवार रोजी कन्नड येथे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना प्रकल्प कार्यालय औरंगाबाद आयोजित शिक्षण हक्क परिषद व पालक मेळावा माेठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.उदयसिंग राजपूत साहेब (आमदार कन्नड-सोयगाव),उपस्थित होते.
प्रमुख वक्ते:- मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब (संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष एकलव्य संघटना ) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.विलास कटारे साहेब (विभागीय अध्यक्ष आ.वि.वि.क.संघटना अमरावती) होते.
प्रमुख अतिथी:- मा.श्री.अरूण कोळी साहेब (प्राध्यापक -चोरटाकर,पारधी समाज संघटना औरंगाबाद), मा.श्री.खेमा मध्ये साहेब (माजी सभापती कन्नड), मा.श्री.सुनिल ठाकरे साहेब (औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष एकलव्य संघटना), मा.श्री.परशुराम सोनवणे साहेब (जिल्हा सचिव औरंगाबाद), मा.श्री.भिकन पवार साहेब (ता.अध्यक्ष कन्नड एकलव्य संघटना), मा.श्री.बापु तलावडे साहेब (ता. अध्यक्ष टायगर गृप कन्नड), मा.श्री.मच्छिंद्र गायकवाड साहेब (ता.उपाध्यक्ष कन्नड ,ए.सं), मा.श्री.राजु ठाकरे साहेब (शहर प्रमुख कन्नड, ए.सं), मा.श्री.सुभाष सोनवणे साहेब (ता.संघटक कन्नड, ए.सं.), मा.श्री.रघुनाथ पवार साहेब (ता.युवा सचिव कन्नड), मा.श्री.तेजराव ठाकरे साहेब (करंजखेड सर्कल प्रमुख), मा.श्री.गौतम पवार साहेब (प्रसिद्धिप्रमुख कन्नड), मा.श्री.प्रकाश वाघ साहेब (नागद सर्कल प्रमुख), मा.श्री बंडु सोनवणे,मा.अनिल गायकवाड इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शासकिय आश्रम शाळा वडनेर, ब्राम्हणी, नागद , तिसगाव, सर्व शिक्षक कर्मचारी, तसेच शासकीय वसतिगृह कर्मचारी, तसेच बहुसंख्येने आदिवासी समाज या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी मा.श्री .पवनराजे सोनवणे साहेबांनी समाजाला मार्गदर्शन करत असतांना त्यांनी सांगितले कि, पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे , तसेच शिक्षकांनी विद्याथ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे दिवसेंदिवस आदिवासी आश्रम शाळेचा निकाल कमी होत चालला आहे.
त्यामुळे आश्रम शाळेत विद्यार्थी कमी होत चालले आहेत .त्यांना चांगल्या दर्जाचं जेवन द्या .आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण जर विद्यार्थ्याना दिलं तर शाळेत विद्यार्थी वाढतील .पालकांना मुलांना शिक्षणावर भर देण्यास सांगावे ,तसेच शिक्षणाचे महत्व उपस्थित असलेल्या पालकांना समजावून सांगितले .तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांनी माेलाचे मार्गदर्शन केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार