राजकीय पक्षांनी गोवारी एसबीसी प्रवर्गातील जातीला अनु जमाती सीटची उमेदवारी देवू नये.

By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


राजकीय पक्षांनी गोवारी एसबीसी प्रवर्गातील जातीला अनु जमाती सीटची उमेदवारी देवू नये.



नँशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन व बिरसा फायटर्सच्या वतीने राजकीय पक्षांना प्रसिध्द पञातून उलगुलान 


एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ


साकोली (२९) प्रेसनोट आदिवासी विकास विभाग:- गोवारी जातीची आदिवासी जमातीतील घुसखोरी मा.सर्वोच्च  न्यायालयाचा प्रतिबंध या आशयाचा निर्णय दि. १८/१२/ २०२० रोजी सीव्हील अपील नंबर २०९६/२०२० ( महाराष्ट्र शासन विरूध्द केशव सोनोने )या प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाचा  तीन खंडपीठाच्या न्यायमुर्तीने ऐतिहासिक न्यायनिवाडा देवून लाखोच्या संख्येने असलेल्या गोवारी जातीच्या समुदायाला आदिवासी जमातीमध्ये घुसखोरी करण्यापासून थांबवून महाराष्ट्रातील खर्या आदिवासींना न्याय दिला होता. 


मुंबई उच्च न्यायालच्या नागपुर खंडपीठाने दि.१४.८.२०१८ रोजी न्यायनिर्णय देवून महाराष्ट्र गोवारी जातीच्या लोकांना 'गोंड गोवारी' असा अजब गजब निर्णयाचा फास व आदिवासी जमातीला मिळणारे आरक्षणाचे फायदे नाकारण्यात येणार नाही. आणि गोवारी जातीच्या लोकांना "गोंड गोवारी" अनु.सु. जमातीची जात प्रमाणपञे देण्यात यावे असे आदेश दिले होते. सदरहू उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय हा महा खर्या आदिवासी समाजासाठी धक्कादायक व अन्यायकारक  होता. माञ.दि.१४.८.२०१८च्या निर्णयास मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याऐवजी तत्कालीन युतीसरकार व महसुलमंञी मा.चंद्रकात दादा पाटील यांनी दि.३०.११.२०१८ला ‌विधानसभेत सरकार या निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात अपील करणार नाही  असे विधानकरून युती सरकारच्च्या वतीने' गोवारी'जातीच्या आदिवासी जमातीमधील घुसखोरीला एक प्रकारे बळ देण्याचे काम केले.


सदर निर्णया विरोधात लढा देण्यासाठी खर्या आदिवासीच्या संघटणा अनुक्रमे, ट्राईबल आँफिसर्स फोरम, आदिवासी हक्क संघर्ष समिती, आदिवादी सम्मान कॄती समिती, आदिवासी राजपञित आ म. आदिवासी बचाव,आँ आदिवासी ए फे,ट्रा डाँ फोरम,आदिवासी विद्यार्थी संघ,बिरसा क्रा़ंती दल व बिरसा फायटर्स इत्यादि महासरकारला निवेदने,देवून, उच्च न्यायालयीन निर्णय चुकीचा आहे 


सर्वोच्च न्यायालयात आव्हाणीत करण्यासाठी विनंती केली. आणि त्यांचे यशाला फळ आले गोवारी हे आदिवासी नाहीत असा मह्त्वपूर्ण निर्णयाने जर असे राजकीय पक्ष संविधान विरोधी 'इलेक्शन आँफ कँन्टेंम्पट'आहे. गोवारींना एसटीसीटवर उमेदवारी देत असेल तर मोठी फळी पक्षा तून बाहेर पडेल व सर्वच पक्षांना याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतील.असा सर्वकयास व बिरसा फायटर्सचा व नँ आ पी फेडरेशनचा विरोध राहील असा सज्जड इशारा प्रसिंध्दपञकात दिला आहे.






अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO



 



Post a Comment

0 Comments

झाले