By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी-गणेश खर्डे जिल्हाध्यक्ष नंदुरबार
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ
आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा आणि पिढ्यानपिढ्या
चिरकाल टीकणाऱ्या वनजिमिनीच्या प्रमाणपत्र व सातबाराच्या मिळकतीसाठी पहिली सभा
भोईटी ता. शिरपूर (जि. धुळे) यशस्वी पार पाडल्यानंतर दि.२७/११/२०२१ रोजी मौजे
जामण्यापाडा ता. शिरपूर येथे दुसरी सभा बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने प्रलंबित
वनदाव्यांसंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी वनदाव्याच्या प्रमाणपत्रावरील मंजुर क्षेत्र
आणि प्रत्यक्षात कसत असलेल्या जमीनीतील तफावत, वनपट्टेधारकांना आलेल्या नोटीसा, पीककर्ज मिळणे, सरकारी योजनांचा लाभ मिळणे आदी विषयांवर बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष
मनोज पावरा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर मौजे भोईटी येथील भोंग्या पावरा, माजी पोलीस पाटील यांनी वनदाव्यांबाबत आपल्या समस्या काय आहे हे समजावून
सांगितले.
नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा यांनी वनदावे
निकाली काढण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता आणि सरकार व प्रशासनाची उदासिनता यावर
भाष्य केले. धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा यांनी वनदाव्यांबाबत सरकारचे धोरण आणि
कायदे स्पष्ट करून 'उलगुलान' पुकारण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी काकड्या पावरा, संघटक, बिरसा फायटर्स, भावसिंग पावरा माजी पोलीस पाटील, जामण्यापाडा, सुरेश पावरा, जगन पावरा, ढेमा पावरा, रमेश पावरा, भाईदास पावरा, वेरसिंग पावरा, रमेश पावरा, भावलाल पावरा, खुमसिंग पावरा बिरसा फायटर्सचे गेंद्या पावरा, हिरालाल
पावरा , कैलास पावरा, सुभाराम
पावरा, दिलीप पावरा, राहंग्या
पावरा, लोट्या पावरा, संजय
पावरा, चंपालाल पावरा व वनपट्टेधारक शेतकरी उपस्थित
होते.
यावेळी शेतकऱ्यांनीही आंदोलन करण्यासाठी तयार
असल्याचे आश्वासन दिले.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार