क्रांतिवीर बिरसा मुंडाची जयंती म्हणजे आदिवासी मुलनिवासींचे सामाजिक-सांस्कृतिक ऊलगुलान !

By आदिवासी युवा




एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 


- व्याख्याते , प्रा. राहूल तागडे यांचे जळजळीत प्रतिपादन ---------------------


         " भारतीय संविधानाच्या अनुसूची पाच व सहानुसार केलेल्या आदिवासींच्या संदर्भातील कायदारुपतरतूदी , संविधान सभेतील जयरामसिंहांची साक्ष आणि २००१ मधील एका खटल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार तथा भीमबेटका , आदिमगड सारख्या ७३ हजार वर्षापूर्वीच्या पुरातत्त्वीय ऐतिहासिकतेमुळे आदिवासी हेच भारताचे मुलनिवासी असून शंभोमाधवा,कुमार लिंगो, आलामकलाम ही महानुभावी आदिमप्रेरणा होत तर विदेशी ब्रिटिश राजवटी विरोधात अव्वल इंग्रजी कालखंडात जल-जमीन-जंगलसाठी क्रांतिवीर बिरसांनी जे आदिवासीस्वस्मितेसाठी आंदोलन उभे केले; ते इतिहासाने सुवर्णाक्षरात नोंदविले आहे. तेव्हापासून आजतागायत आणि पुढे सुध्दा १५ नोव्हेंबर क्रांतिवीर बिरसा मुंडांची जयंती म्हणजे आदिवासी-मुलनिवासींचे सामाजिक-सांस्कृतिक ऊलगुलान होय ! " , असे मौलिक प्रतिपादन व्याख्याते , कवी प्रा. राहूल तागडे यांनी केले.




          ते विशेष मार्गदर्शक म्हणून बिरसा मुंडा जयंती उत्सवात बोलत होते. आदिवासी विद्यार्थी युवा संघटना तथा समस्त आदिवासी समाजबांधव पिंडकेपार यांच्या संयुक्तिक विद्यमाने कृषी अधिकारी , घनश्याम तोडसाम यांचे अध्यक्षतेखाली तर आदिवासी ध्वजाचे ध्वजारोहण श्रीपत वरकडे यांचे मंगलहस्ते करून जयंती महोत्सवाचे यशस्वी आयोजन पिंडकेपार येथे करण्यात आले.




           या प्रसंगी कवयित्री आशा गेडाम वणी आणि प्रा. देवदास काटेंगे या भाष्यकार द्वयींनी अनुक्रमे समाजकार्यात आदिवासी महिलांचा सहभाग आणि आदिवासी समाजसंस्कृतीच्या संवर्धनाची गरज या विषयांवर कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष प्रकाश टाकला. माजी जि.प.सदस्य नंदु समरीत , सरपंचा सुनिता समरीत , पतिराम निंबेकर, मानिक कापगते , डॉ. राजकुमार समरीत,संजय वैद्य, रत्नमाला शाहारे, तलाठी मनिषा उईके, पोलिस कर्मचारी चंद्रभान मडावी , विनोद कंगाले आदी मान्यवर उपस्थित होते.

      


          आदिवासी मुलींनी विविध पारंपरिक नृत्याविष्कारातून आदिवासी संस्कृतीचे फार मनोज्ञ दर्शन घडविले. आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिक , जमीन दानदाते म्हणून धृपता वरकडे, लाला वरकडे आणि इतर ज्येष्ठांचा यथोचित स्वागत- सत्कार या प्रसंगी करण्यात आला.




      आदिवासी सांस्कृतिक-प्रबोधन नृत्य रॅली तथा सहभोजनाने जयंती महोत्सवाजी सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन माजी सरपंच दुलीचंद कुसराम तर आभार अमित टेकाम यांनी केले. जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

Post a Comment

0 Comments

झाले