देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिला अग्नीकुंड आदिवासींनी पेटवला। - दशरथ मडावी

By आदिवासी युवा


देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिला अग्नीकुंड आदिवासींनी पेटवला


आदिवासी समुदायातील अनेक क्रांतिकारक नेते, समाज सुधारक ,यांचीभारतातील इतिहासकारांनी  पाहिजे तशी दखल अजूनही घेतलेली नाही. आणि आदिवासी समुदायांमध्ये आपल्या नेत्यांचे उदात्तीकरण करावे, त्याच्या महत्तम कार्याची महती समाजासमोर सातत्याने गहात राहावे. त्यांच्यावर मोठी ग्रंथसंपदा लिहावीत, व्याख्यानमाला आयोजित करावी ,त्यांच्या विचारांचे योग्य विश्लेषण करावे, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी भावना आदिवासी समुदायांमध्ये अभावानेच आढळते. त्यामुळे आदिवासी समाजात जन्मलेल्या महान वीरांची ,विद्वानांची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी करता आली नाही .त्यामुळे आदिवासी समाजातील अनेक दूरदर्शी नेतृत्व, नेते मंडळी उपेक्षित राहिली.


आतातरी नवागत इतिहासकारांनी इतिहासाची पुनर्मांडणी  झाली पाहिजे अशी सातत्याने मागणी करीत राहावे. कारण येथील परंपरावादी इतिहासकार 1857च्या उठाव आला स्वातंत्र्याचे पहिले बंड म्हणून संबोधतात . आणि त्याही पूर्वी झालेल्या विद्रोहाकडे  पूर्णपणे डोळेझाक करतात. हा खऱ्या इतिहासाशी केलेला द्रोह आहे असे, म्हटल्या वाचून राहवत नाही .यासंदर्भात आदिवासींच्या उठावा कडे जरा दृष्टी टाकली तरी सहजपणे कळून येईल की, पश्चिम बंगालच्या संथाल परगण्यांत आदिवासींचा अतिविशाल विद्रोह झाला होता .त्यात संथाल आदिवासी युवक सिद्धू कानू हे त्या उठावाचे नायक होते. 


इंग्रज जमीनदार अधिकारी यांच्याविरुद्ध प्रचंड आंदोलने त्यांनी सुरु केले होते.7 जुलै 1855 महेश लाल दरोगा यांची हत्या केली. 20 हजार आदिवासी वीरांनी अंबर प्रगण्यावर हल्ला करून तेथील राजभवनावर ताबा मिळवला होता. त्यानंतर सिद्धू आणि कानू या दोन आदिवासी वीर बंधूंना 1855  मध्ये इंग्रज सरकारने फासावर लटकवले. परंतु आदिवासींचा विद्रोह थांबला नाही. या आंदोलनात जवळजवळ दहा हजार आदिवासी शहीद झाले.      


छोटा नागपूरच्या परिसरात ताना भक्ताच्या आंदोलन, किंवा रांचीच्या छिपडी  नवा टोलितील  एक पंचवीस वर्षाचा युवक जत्रा राव यांचा सत्याग्रह. मीर कासीमच्या विरोधात आदिवासी विरांगणा सिनगी दहिने आदिवासी महिलांच्या सेनेची उभारणी करून प्रचंड मोठा संघर्ष केला होता. आंध्रप्रदेशात सीताराम राजू यांनी आदिवासी युवकांची फळी उभारून इंग्रजांशी सशस्त्र गोरिला युद्ध छेडले होते. 


जालीयन वाला बागेत 300 लोक मारले गेले व 600 लोक जखमी झाले होते . याची दखल देशभक्तीच्या स्वरूपात घेतली गेली. परंतु राजस्थानातील माननगड पहाडावर भिल्ल आदिवासींच्या उठाव झाला, त्या इंग्रजांच्या व राजपुतांच्या सैन्याकडून 150 हजार भिल्ल आदिवासी निर्दयपणे मारले गेले. त्यांची दखल सुद्धा घेतल्या गेली नाही. 1844 ते 1848 या दरम्यानच्या कालखंडात पुणे, ठाणे या परिसरात राघोजी भांगरे आदिवासी वीरांनी आपल्या आदिवासी बांधवांचे सैन्य उभारले ,व ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा उभा केला होता. 


इंग्रज सरकारने त्यांना पकडले व 2 मे 1848 रोजी राघोजी भांगरे यांना ठाण्याच्या तुरुंगात फासावर लटकवले .18 सप्टेंबर 1857 रोजी महाराज शंकशहा  व त्याचा पुत्र रघुनाथ शहा मडावी या दोन्ही पिता-पुत्रांना ब्रिटिश सरकारने तोफेच्या समोर बांधून उडवून दिले. मोलपल्ली घोटचे  जमीनदार विर बाबुराव पुल्लीसुर शेडमाके यांना 21 ऑक्टोबर 1857 ला चंद्रपूरच्या जेल समोर, हजारो लोकांच्या समोर पिंपळाच्या झाडाला लटकवून फासावर लटकविले. परंतु आमचा इतिहास व इतिहासकार मात्र शांत राहिले . 


इतिहासाच्या पानावर छोटा मोठा उठाव देखील मोठ्या चविष्टपणे रंगवण्यात आला. परंतु आदिम विरांच्या  संग्रामाला इतिहासात जागा मिळू शकली नाही .म्हणून स्वातंत्र्याची ठिणगी जोपासणारा आज मुक्तपणे बोलू लागला. त्यातूनच बिरसा मुंडाच्या आंदोलनाला सुरुवात झाली.आणि हा आवाज भारतभर घुमू लागला  असे प्रतिपादन दशरथ मडावी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हरिदास धुर्वे यांनी केले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून  प्रा.गिरिजा उईके(अध्यक्ष, बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य महिला फोरम) मा.अजयकुमार कवडे,(प्रदेश अध्यक्ष बिरसा क्रांती दल मध्यप्रदेश )अरविंद खैरकार, (अध्यक्ष पूर्व विदर्भ प्रमुख बिरसा क्रांती दल )मारुती उईके ,अमरावती विभाग


अर्जुन यु्वनाते (बिरसा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष) सौ.रेखाताई कोडापे (माजी नगराध्यक्ष),लताताई परतेकी (नगरसेवक) उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र कोडापे जिल्हा अध्यक्ष बिरसा एम्पलोयी फॉर्म, तुमडाम सर, कानू बेलसरे, हेमंत प्ररतेकी, नितीन वरखडे, संजय कुळसंगे ,निलेश उईके, श्रीमती जया सलामे, सविता जांबे, मंगेश मसराम, भीमराव उईके, राजू कुमरे, उमेश कुमरे, अनिल भलावी, दिनेश ,शेषराव उईके, उमेश कंगाले ,चेतन धुर्वे यांनी केले.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO





Post a Comment

0 Comments

झाले