"जननायक बिरसा मुंडा यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा" सर्व समाज वर्गाची मागणी.

By आदिवासी युवा




गोंदिया :- 15 नोव्हेंबर ला बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती साजरी होत आहे. जननायक बिरसा मुंडा यांचे राष्ट्र व समाजाप्रती असलेले निस्वार्थ समर्पण व बलिदान पाहता त्यांना "भारतरत्न" प्रदान करण्यात यावा, अशी मागणी भारताचे पंतप्रधान/केंद्र सरकारला, बिरसा क्रांती दल, संविधान मित्र संघटना यांनी केली आहे. , राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, ओबिसी संघर्ष कृती समिती, ओबिसी सेवा संघ, युवा बहुजन मंच आणि इतर सर्वसमाज संघटनांनी केली आहे.  


वरील मागणीचे निवेदन पंतप्रधान/केंद्र सरकार यांना बिरसा क्रांती दल, संविधान मित्र संघटना आणि सर्व समाज संघटनेने जिल्हा दंडाधिकारी गोंदिया यांच्या मार्फत देण्यात आले.  निवेदन तहसीलदार गीता सरादे (एसडीओ कार्यालय, प्रशासकीय इमारत, गोंदिया) यांनी स्वीकारले.  मालती कन्नाके (बिरसा क्रांती दल जिल्हाध्यक्ष), अतुल सतदेवे (संयोजक संविधान मित्र संघ), कैलाश भेलावे (ओबिसी सेवा संघ), रवी भांडारकर (ओबिसी संघर्ष कृती समिती), सुनील भोंगाडे (युवा बहुजन मंच), दिलीप कोसरे (रंगकर्मी कलाकार संघटना) संगीता पुसाम (आदिवासी महिला फेडरेशन), हेमलता आहाके, बिंदू कोडवते (राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ), हिमांशू आहाके, लोकेश कुसराम, सुमीत उईके, प्रांकज कुंभारे, साहिल कोटांगले, प्रियांशू कुंभलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांची भूमिका महत्त्वाची आहे. समग्र स्वतंत्रता समर यांचा समन्वय बिंदू जननायक बिरसा मुंडा हे संपूर्ण राष्ट्र-समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहे.  इतिहासात जननायक बिरसा मुंडा हा असा नायक होता ज्याने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या क्रांतिकारी विचाराने आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून एका नव्या सामाजिक आणि राजकीय युगाची सुरुवात केली.  


जननायक बिरसा मुंडा यांनी काळ्या कायद्यांना आव्हान देऊन बर्बरतेच्या ब्रिटिश साम्राज्याला कंठस्नान घातले.  पराक्रम आणि सामाजिक प्रबोधनाच्या जोरावर बिरसा हे खऱ्या अर्थाने तत्कालीन काळातील एकलव्य होते.  


आदिम संस्कृतीची खिल्ली उडवणे बिरसा यांना सहन होत नव्हते.  त्यांनी अंधश्रद्धाळू ढोंगीपणाचे खंडन केले आणि लोकांना हिंसा आणि मादक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.  त्याकाळी निष्पाप आदिवासींना अधिक त्रास देण्याचे काम इंग्रजांनी आणि सावकारांनी, जमीनदारांनी, जहागीरदारांनी केले.  या विरोधात अवघ्या 25 वर्षांच्या अल्पशा आयुष्यात बिरसा मुंडा यांनी उठाव केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.  


आदिवासी समाजावरील होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढा देत मज़लूम आदिवासींना प्रोत्साहन देऊन त्यांचे पाणी, जमीन आणि जंगल वाचवण्यासाठी संघटितपणे काम करणाऱ्या बिरसा मुंडा यांना  भारतरत्न सम्मान पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती पंतप्रधान/केंद्र सरकार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO





Post a Comment

0 Comments

झाले