By आदिवासी युवा
जळगांव:- आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगांव जिह्यातील जळगांव जामनेर येथील विभागीय प्रांतकार्यालय येथे. प्रांताधिकारी यांना एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात दिलेल्या प्रमुख मागण्या
१) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाज दफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे.
२) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्या लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत असून त्यांच्या नावे जागा नाही अश्या लाभार्थ्यांना शासन जिआर नुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावे.
३) आदिवासी भिल समाज कसत असलेल्या वन जमीन व गायरान जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर नोंद करून मालकी हक्क मिळावा.
४) आदिवासी भिल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावे.
५) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल याची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी.
६) शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध योजनांचा लाभ दोन ते तीन महिन्याच्या आतच देण्यात यावा.
७) शबरी घरकुल योजनेचे उदिष्ट वाढवून मिळावे
असे निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना देण्यात आले
यावेळी निवेदन देतांना एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब जळगांव जिल्हाध्यक्ष (जळगांव लोकसभा) मा.संजुबाबा सोनवणे जळगांव जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) मा.निवृत्ती पवार युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे अपंग सेल जिल्हाध्यक्ष मा.ऋषीदादा सोनवणे जळगांव तालुकाध्यक्ष मा.मंगल सोनवणे जळगांव महिला आघाडी तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती सौ.मिराताई मोरे जळगांव तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच विटनेर अरुण पवार जामनेर तालुकाध्यक्ष विलास मोरे तालुका उपाध्यक्ष दिपक सोनवणे एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे पारोळा तालुकाध्यक्ष गणेश गायकवाड धरणगांव तालुकाध्यक्ष संजय पवार जेष्ठ कार्यकर्ते भिवसनबाबा भिल युवा जिल्हा संघटक सुभाष मालचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष समाधान जाधव एरंडोल युवा तालुकाध्यक्ष जय मोरे एरंडोल तालुकाउपाध्यक्ष राहुल सोनवणे चाळीसगांव तालुकाध्यक्ष मोतीदादा पवार पारोळा व तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते चंद्रभान मोरे भानुदास गायकवाड किरण मोरे विनोद मोरे समाधान सोनवणे सुक्राम मोरे अशोक मोरे सचिन सोनवणे प्रविण पवार लक्ष्मण गणेश मोरे ह्यावेळी उपस्थित होते.
तसेच आज जळगांव महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.मिराताई मोरे (माजी पंचायत समिती सभापती) यांनी निवड करण्यात आली त्यासोबतच युवा जिल्हा संघटक सुभाष मालचे जळगांव शहराध्यक्ष पदी राहुल ठाकरे यांची निवड एकमताने करण्यात आली.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार