'अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही' - शरद पवार

By आदिवासी युवा


'अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी  नक्षली असू शकत नाही'



नाशिक : अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी हा नक्षली असूच शकत नाही. शिवरायांचे राज्य हे भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखल्या जाते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी व्यक्त केले. 


'अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी  नक्षली असू शकत नाही'


इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सन्मान बाडगीच्या माचीचा या कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी शरद पवार म्हणाले की, पिढ्यान पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची खूप गरज आहे. राघोजी भांगरे यांचे स्मारक आपण उभारतो आहोत. आदिवासी समाजाची तरुण पिढी इथे आली याचा आनंद आहे. 


'अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी  नक्षली असू शकत नाही'


आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. खरे तर अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. पुढच्या आठवड्यात मी स्वतः नक्षली भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथल्या युवकांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


पवार पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असे कुणी केले नाही. ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्याचे राज्य असे म्हटले जाते. भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली, पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. 


बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.




अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

Post a Comment

0 Comments

झाले