जिसका कोई दल नही उसका कोई बल नही - डी.बी.अंबुरे ( राज्य उपाध्यक्ष बिरसा क्रांतीदल )

By आदिवासी युवा




क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १४६ व्या  जयंतीनिमित्त  कामठवाडा,तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनडी.बी.अंबुरे ( राज्य उपाध्यक्ष बिरसा क्रांतीदल )  बोलत होते. 


महानायक बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीनी साठी इंग्रजांविरुद्ध तसेच येथील दीक्कु विरुद्ध लढा दिला. आदिवासी समाजाला स्वातंत्र्याचे मान व आत्मसन्मान, स्वावलंबनासाठी लढण्यासाची त्यांनी प्रेरित केले. इंग्रज सरकार यांच्या विरोधात त्यांनी आंदोलने केली व वेळप्रसंगी सशस्त्र लढा सुद्धा दिला. 


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सुभेदार नारायणराव पीलवंड, परशुराम टेकाम, गावचे सरपंच सौ छाया ताई डावरे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन गावातील सर्व तरुण युवक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव आत्राम (अध्यक्ष, बिरसा क्रांती दल कामटवाडा) विवेक विवेक  मडावी, सचिन  काळे ,ऋषिकेश मैघने, संकेत मोकासे, सुरज परचाके ,अमित परचाके ,संतोष कोटनाके, विजय काळे, सुरेश जांभोरे,विनोद परचाके,विवेक उईके,अक्षय नारनवरे, शुभम कोकांडे, अक्षय टेकाम,अमित गोसावी, यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कुमारी प्रणिती अगलदरे यांनी केले. गावातील सर्व स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO



 

Post a Comment

0 Comments

झाले