शासन परिपत्रक ९ सप्टेंबरचे. मग, आदिवासी वसतिगृहे बंदच का? - बिरसा फायटर्स

By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


शासन परिपत्रक ९ सप्टेंबरचे. मग, आदिवासी वसतिगृहे बंदच का? - बिरसा फायटर्स



प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव जिल्हाध्यक्ष नंदुरबार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ

    

नंदुरबार(प्रतिनिधी) ४ ऑक्टोबर पासून शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच शाळा,महाविद्यालयांनी इ. ८ ते १२ पर्यतचे वर्ग सुरू करण्यात आले.राज्यात बऱ्याच भागात कोविड-१९ चे नियम पाळून १५ जुलैपासूनच अनेक शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरू आहेत. 


आता सर्वच शाळा,महाविद्यालये सुरू असतांना वसतिगृहे बंद का? आदिवासी विभागाने दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी शासन परिपत्रक काढून वसतिगृहे सुरू करावीत म्हणून पत्र काढले.मग, तीन महिने होत आली तरी अनेक वसतिगृहे बंद का? वसतिगृहे सुरू का केली जात नाही? त्यामुळे तालुक्याचा, जिल्ह्याचा ठिकाणी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे वसतिगृहे सुरू नसल्याने रूमभाडे करून जेमतेम दिवस काढत आहे. 


आदिवासी विद्यार्थ्यांचा  खेळखंडोबा का? याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच कोविडमुळे दीड वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून लांब आहे. विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. 


वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी बंद असलेले वसतिगृह त्वरित सुरू करावीत यासाठी बिरसा फायटर्सचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे यांनी प्रशासनाला स्मरण निवेदन पाठवून मागणी केली आहे.








अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO






 

Post a Comment

0 Comments

झाले