कोडीद येथे संविधान दिनानिमित्त एकदिवसीय युवा जनजागृती मेळावा.!

By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


कोडीद येथे संविधान दिनानिमित्त एकदिवसीय युवा जनजागृती मेळावा.!


प्रतिनिधी- गणेश खर्डे जिल्हाध्यक्ष नंदुरबार


धुळे दि. २६नोव्हेंबर रोजी कोडीद येथे संविधान दिनानिमित्त एकदिवसीय युवा मेळावा आयोजित करण्यात आला. आदिवासी क्रांतीकारक ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे सत्कार करण्यात आला ह्यानंतर संविधान दिनानिमित्त संविधान वाचन डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले व जमलेल्या आदिवासी युवांनी संविधान वाचन तदनंतर केले.


ह्यावेळी आदिवासी समाजातील नवयुवकांना सामाजिक चळवळीची नवी व योग्य दिशा देण्यासाठी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केले.


ह्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष आप.लकीभाऊ जाधव ह्यांनी नवयुवकांना सामजिक चळवळ काय असते व ह्यासाठी आम्ही कायम सोबत आहोत असे अनेक विषयांवर मार्गदर्शन केले, 


जयस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा ह्यांनी संघटनेसोबत जुडण्याबरोबरच शिक्षणाशिवाय सामजिक संघटन मजबूत नाही ह्या विषयावर मार्गदर्शन केले, शिक्षण हाच सर्व गोष्टींवर शेवटचा पर्याय आहे असे युवकांना मार्गदर्शन केले, 


रावण राजे फाऊंडेशनचे जिल्हा युवा अध्यक्ष निलेश पावरा यांनी महात्मा राजा रावण विषयी मार्गदर्शन केले, आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष आप.दारासिंग पावरा, जयस शिरपूरचे अध्यक्ष पोलीस पाटील आप.भूपेश पावरा, मोहन खाडे सर ह्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.


ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कालुशाह पिरबाबा दर्गा, कोडीद येथील मैदानात कोडीद धुळे जिल्हा, शिरपूर तालुका येथील रावण राजे फाऊंडेशनचे युवा व आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सर्व पदाधिकारी ह्यांनी केले.



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

Post a Comment

0 Comments

झाले