जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा:मा.दशरथ मडावी

 By आदिवासी युवा


जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा:मा.दशरथ मडावी


आदिवासी समुदायाच्या क्रांतिकारकांनी लढलेल्या समग्र स्वातंत्र्य समराचा समन्वय बिंदू म्हणजे जननायक बिरसा मुंडा होय. आज संपूर्ण भारत देशात आदिवासी अस्मितेचे प्रतीक म्हणून बिरसा मुंडा हे पुढे आले आहे .बिरसा मुंडा ने १८५७ च्या पूर्वी झालेल्या आदिवासी उठावाचे सूत्र पकडून वर्तमानातील अत्याचारांना वाचा फोडीत भविष्याचा वेध घेत आपल्या आंदोलनाला गतिमान केले. बिरसा मुंडा यांचे आंदोलन सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अंगाने विकसित झालेले आंदोलन होते.


जननायक बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा:मा.दशरथ मडावी


या भारत मातेच्या क्रांती पुत्राचा सन्मान होणे गरजेचे आहे .आज आदिवासी युवकांचे बिरसा मुंडा एक प्रेरणास्थान आहे. अस्तित्व ,अस्मिता शोधण्याचे प्रबळ कारण आहे ,म्हणून भारत सरकारने 15 नोव्हेंबर 1989 ला बिरसा मुंडा तिकीट काढले 16 ऑक्टोबर 1989 ला बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अनावरण केले. एवढेच नाही तर तत्कालीन राष्ट्रपती महामहीम के आर नारायण यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 1998 ला भारतीय संसदेच्या आवारात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 


त्यावेळेस बोलताना राष्ट्रपती महोदय म्हणाले बिरसा मुंडा एक महान समाजसुधारक, रचनात्मक ,प्रतिभा के धनी थे.और इन् सबसे  से अधिक उत्साही  राष्ट्रप्रेमी थे  एक ऐसा महान स्वातंत्र्य सेनानी जो आंगन की तुलसी के समान हर एक किसिके सहाय्यता के लिए  तत्परता था.


सदर निवेदन  मा.जिल्हाधिकारी ,यवतमाळयांचे मार्फत पंतप्रधान कार्यालय न्यू दिल्ली यांना देण्यात आले. त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी,मा.किरण कुमरे,महासचिव म.रा.,केशव बोरकर,रमेश भिसनकार,संजय मडावी,अतुल कोवे,मेजर जीवन कोवे,रमेश मडावी,राजेश गेडाम,मंगेश पोयाम,हेमंत मेश्राम,मानिक मडावी,रवी मेश्राम,सहदेव मडावी,मनिष मडावी,मोरेश्वर चतुर,शुभम मडावी,बाबाराव मडावी,तेजस कोडापे,मनोज मडावी,रवी मेश्राम उपस्थित होते.



संजय मडावी 

जिल्हा महासचिव

बिरसा क्रांती दल,यवतमाळ



अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO











Post a Comment

0 Comments

झाले