By आदिवासी युवा
सिन्नर : इगतपुरी तालुक्यातील सोनोशीत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवारी (दि.१४) सकाळी ११ वाजता राज्यव्यापी आदिवासी सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून वासाळी फाटा येथे शंभर एकर क्षेत्रावर साकारणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, वनराज्यमंत्री दत्ता भरणे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तर विशेष अतिथी प. बंगालचे वनमंत्री बिरबाहा हांसदा, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार माणिकराव कोकाटे, पड़ाश्री बीजमाता राहीबाई पोपरे, आमदार डॉ. किरण लहामटे, दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, सुनील भुसारा, नितीन पवार, राजेश पाटील, दौलत दरोडा, सुनील शेळके आदी उपस्थित राहणार आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर,नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतून प्रत्येकी पाच सांस्कृतिक पथके येणार आहेत.
बाडगीची माची सोनोशी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन विरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शरद लहांगे, मोहन कुंदे, विठ्ठल खोकले, पांडुरंग मेंगाळ, गौरी पवार, सविता डगळे, विक्रम कवटे, राजेंद्र बेंडकुळे, शिवाजी डगळे, सूरज पवार, रघू पवार, बहिरू जाधव, शिवाजी खेताडे आदींनी केले आहे.
राघोजी भांगरे, बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सांस्कृतिक महोत्सव राघोजी भांगरे व धरतीआवा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राघोजी भांगरे व झाजांविरुद्ध बंड करणारे बंडकऱ्यांचे निवासस्थान इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथील उंच डोंगरावर घनदाट जंगलात बाङगीची माची प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक पावन स्थळाच्या जवळ सोनोशी गावात या स्थळाला उजाळा देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्री व सातपुडा संघटनेच्यावतीने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवाओं के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार