By आदिवासी युवा
विरांगणा महाराणी दुर्गावती आदिवासी महिला प्रगती मंडळ कल्याण ह्या मंडळाचा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील मंडळाच्या अध्यक्षा मा प्रमिलाताई मसराम यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 31/10/2021 रोजी शिरोली आदिवासी कातकरी पाडा व धनगरवाडी ठाकर आदिवासी अंबरनाथ पुर्व ह्या ठिकाणी श्रध्दांजली / विर शहीद बाबुराव शेडमाके बलिदान दिन / आचार्य मोतीरावन कंगाली स्मृतिदिन /प्रबोधन मार्गदर्शन /फराळ वाटप /कपडा वाटप / आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप कार्यक्रम पार पडला.
प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाला अंबरनाथ पोलिस्टेशनचे API भोयर साहेब PSI वर्हाड साहेब / मारगाये साहेब / मलये साहेब व डाॅ विनोद कुमरे हे उपस्थित होते आरोग्य शिबीराचा साधारण 200 आदिवासी समाज बांधवांनी लाभ घेतला आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा अ सोयाम यांनी केला तसेच कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन मंडळाचे संचालक प्रभुदास पंधरे यांनी केले कार्यक्रमाला मंडळाचे सर्व पदाधिकारी व मंडळाचे हितचिंतक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार