By आदिवासी युवा
जखमी काँमन स्नीप दॄर्मिळ पक्षी यास जीवंत वाचविल्यानंतर २४ तासात मॄत्यु पावले.निसर्ग प्रेमीचा कळवळा.
"पक्षी हे आकाशाचे प्रवासी त्यांना वाचवून पर्यावरण संरक्षित करा" निसर्गप्रेमी सुरेशकुमार पंधरेचे मोबाईलधारका़ना साद.
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली(२५) किन्ही /मोखे गावी हेमराज चिंधु वल्के सदस्य ग्रामपंचायत किन्ही यांच्या शेतात सांयकाळी पाच दरम्यान काल धानाचे भारे बांधने सुरू असता मुलांना काँमनस्नीप (comman snipe) पक्षी धाना च्या सळीवंर जखमी अवस्थेत दिसला. तेव्हा त्यांनी ते पक्षी घरी नेले व हल्दी तेल लाऊन उपचार केले.
मेसेज करून हेमराज वल्केनी निसर्गप्रेमी /लेखक सुरेश कुमार पंधरे विदर्भ प्रदेशअध्यक्ष बिरसा फायटर्स यांना कळविले. व तो जखमी पक्षी हा काँमन स्नीप (Comman snipe) असून चोचलांब नुकीलीदार आहे दिसायला करडा कत्थ्या रंगाचे पंख मातेरी असल्याने खोलवरील जमीनीतील किडे सहजपणे चोचीने सावज टिपतो. आज तो पक्षी मरण पावल्याचे वॄत मिळताच मी भेटायला गेलो तोवर त्या पक्षाचा अंत्यसंस्कार करून सकाळी १० वाजे पर्यंत निसर्गाशक्तीत विलीन करण्यात आले.
अशा दुर्मिळ पक्षांना वाचवा पक्षी वाचेल तर निसर्ग! आपण त्यांच्या मंजुळ आवाजात निसर्गाच्या सानिध्यात सुंदर जीवन जगतों प्राणी व पक्षी हे सर्व मुखे अबोल असले तरी त्यांना भावना आहेत त्यांची कदर करा त्यांचे संवर्धन करा असे मानव अधिकार परिषदेच्या वतीने विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुरेश कुमार पंधरे यांनी नेटकरी व निसर्गाशी संबंधीत शेतकरी वा विद्यार्थी ,कामगार यांनी वेळीच पक्ष्यांना वाचवा असे आवाहन केले.
तसेच मोबाईल धारक व नेटकर्यांना कामापुरताच मोबाईल वापर करा असे म्हटले फुकटचा डाटा पक्ष्यासह मानव जीवास सूध्दा नूकसानदायक व घातक ठरू शकतो.पुढील पिढीला वाचवायचे असेल तर पक्षी,प्राणी यांना वचविण्याची काळाची गरज झाली आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार