शिरपुर तालुक्यात आदिवासी बांधवांना कोरोना VACCINE घेण्यासाठी जागृती निर्माण केली

By आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


शिरपुर तालुक्यात आदिवासी बांधवांना कोरोना VACCINE घेण्यासाठी जागृती निर्माण केली


प्रतिनिधी:- मद्रास पावरा शिरपुर


शिरपूर तालुक्यात बर्याच आदिवासी गवामधे कोरोना लस पोहचलेली नव्हती. आणि आदिवासी समाजमधे लस घेण्यासाठी उदासीनता दिसत होती.  


कोदीड येथे आदिवासी समाजात लसीकरण ची जागृती निर्माण केली तसेच लसीकरण देखील ते पण सातपुड्याच्या परिसरात दुर्गम भागात कोदीड येथील हिरा पावरा आरोग्य अधिकारी बोराडी कोदीड ग्रामपंचायत येथील काही भाग हा संपूर्ण डोंगर दऱ्या वर वसलेलं आहे जिथे रस्ते सुद्धा चांगले नाही.


वाहण्यापाणी तेल्यामहू गुरडपाणी समरादेवी यांच्यात डॉक्टर सोबत अनेक कार्यकर्ते तसेच आशा कार्यकर्ते यांनी देखील मोलाची कामगिरी केली तसेच चांगली भूमिका बजावली। 


डॉ हिरा आणि आशा कार्यकर्ते जिथं पर्यंत रास्ता असेल तिथे पर्यत गाडीवर जायचे ,रास्ता संपला की ते सगळे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर चालत जाऊन लसीकरण चे कर्तव्य पार पाडले आणि शिरपूर शहरात नवीन छाप निर्माण केली. दररोजच्या हाच कार्यक्रम असायचा. 


आदिवासी समाजात शिक्षण चा अभाव कमी असल्यामुळे तेथील लोक vaccine घेण्यासाठी तयार होत नसायचे त्यांच्या मनात सकारात्मक वृत्ती निर्माण करून लसीकरण करून डाॅ. हिरा पावरा यांच्य ा  टीम ने मोलाची कामगिरी बजावली.                     




Post a Comment

0 Comments

झाले