आदिवासी बहुल भागात 9 ते 10 दिवसाचा आदिवासी कुलदैवत डोंगर्यादेवाची सांगता कशी होते.... वाचा सविस्तर माहीती

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✒️मा.आदि.कृष्णा बी पवार ( रवळजी_कळवण )                                                                                                       ( K. A ग्रुप _ आदिवासी शक्ति सेना कळवण तालुका अध्यक्ष )


कळवण :- आदिवासी समाजातील सर्वात मोठी एक अगळी वेगळी संस्कृति व परंपरेच लेन घेउन आलेला सण आदिवासी कुलदैवत डोंगर्यादेव उत्सव पहा👉 कसा होतो 11 ते 12 दिवसाचा कार्यक्रम साजरा..🙏


जय आदिवासी_जय कणसरा माता जय जोहार


नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा कळवण देवळा बागलाण तसेच आदिवासी बहुल भागात आदिवासी कुलदैवत डोंगर्यादेवांना सुरुवात होते

मुख्यत आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे आणी त्यांचे जीवन हा जल जंगल जमीनीशी  निगडीत आहे...

आदिवासी डोंगर्यादेव ह्या सणामध्ये प्रकृती ची पुजा केली जाते...

म्हणजे निर्सगाचा कोप होवु ऩये , घरात सुख-समृध्दी कणी कणसरा शेती बाडीत घरात बरकता यावी, तसेच जल जंगल जमीन  डोंगर्यादेव गडाच्या नवसस्पुत्ती साठी सुख-समृध्दी यावी यासाठी डोंगर्यादेव उत्सव सण रुढी पंरपरेनुसार पुर्वज जनापासुन चालत आलेला आहे व डोंगर्यादेव उत्सवाला सुरुवात ही नोव्हेंबर ते डिसेबर महिन्यात चंद्र दर्शना नंतर सुरुवात होते व हा डोंगर्यादेव उत्सव हा 10 ते 12 दिवस चालतो... 




प्रत्येक गावात सुरुवात ही पहिल्या दिवशी सर्व घरातील एक व्यक्ति माऊली होते व त्यातील पाच माऊल्या च्या म्हणजेच 

1) कणसरा माऊली

2) वांघाब्रा माऊली

3) झेलाशेवर माउली

4) फुलाशेवर माऊली

5) ताराशेवर माऊली.... 

तसेच भगत, मुधानी, मुख्य माऊली, खुट्या, पावरकर, कथकरी यांच्या हस्ते थोंब गाढले जाते... व थोम सभोवती झेंडुचे झाड मुळासकट उपटलेली , वेळुच्या काढ्या, काकडी, ऊस, देवअंबाडी, मोरपिसांचा गुश्या ,गोमतीर ठेवण्याठी भोपळा, ठेवले जातात... 

भगत मुधानी,खळी बांधनुक करत सव्वाशे पुजा टाकुन थोबांची पुजा अर्चना करतो व कथकरी कथेस प्रांरभ होते... आणि उत्सवाला मोठ्या आनंदाने सुरुवात होते....




रोजी संध्याकाळी थोबाच्या सभोवताली गोलाकार करुन नाचतात व गाणी  म्हणतात ... दुसऱ्या दिवसा पासून रोज  माऊल्या शेज, कमारी मागण्या साठी बाहेरगावी, जवळपासच्या गावोगावी वस्ती पाडयावर जातात.यावेळी आदिवासी महिला दिव्याचे ताट करून माऊंल्याना ओवाळतात आणि नागलीचे पिठ, भात, बाजरी, लाल मिर्ची आदिच्या स्वरुपातील  शेज, कमारी बरकत्या बोवाच्या झोळीत टाकतात . यावेळी "बरकत्या बोवा, धन धान्यांची बरकता लाभु दे...गायी गुराना लक्ष्मीला सुख शांती लाभू दे...असे आशिर्वाद देतो". 

आदिवासी आदराने सर्व माऊल्यांना आपल्या घरात , गोठयात बोलावून मक्याच्या फुल्या, कोंडी, भाजलेल्या भुईमुंगाच्या शेंगा, डांगर फराळ म्हणून खाऊ घालतात आणि खुप चांगल्या पध्दतीने 8 ते 10 दिवसाचा कार्यक्रम पार पाडत असतात. 


तसेच प्रत्येक गावच्या नियोजना नुसार डोंगर्यादेवाचा उत्सव मध्ये चोख्यांचा कार्यक्रम ही ठेवला जातो या कार्यक्रमात, कणसरा माउली, साळातीण बाळातीण, उन्हाबाळ, धन्ससर्या, कन्सर्या, वाघदेव,नागदेव मांग्या-तुग्या, शेबरी माता, हनुमान, आदि प्रकारचे पार्ट घेतात आणी नाचतात..

आदिवासी निर्सगपुजक, यांची कथा सांगत वाजत गाजत कार्यक्रम केला जातो...

 

आणि शेवटच्या दिवशी सर्व माऊल्या पाच घर मांगुन संध्याकाळी आपल्या गावातील गावगवुळ गावगडा जवळील राण खळी वर जातात तिथ राञ भर नाचतात व पहाटे मुधानी व शहानी मंडळी मुख्य वरिष्ठ माऊल्या गडावर जाऊन पुजा टाकतात आणि कोंबडा बोकडा नमवतात... व नमवल्यानंतर खाली आवाज दिला जातो..म्ह आवाज दिल्यावर सर्व माऊल्या गडावर दर्शन घेण्यासाठी जातात आणी तेथील चारा आपल्या गाय गुरांणा घेवुन व दर्शन घेवुन गावातील धान्य खळीवर येतात तसेच पाउने राउळे ही खुप मोठ्या संख्येने उपस्थित होतात.. 


हा कार्यक्रम 11 ते 12 वाजपंरत चालत... नंतर सर्व उतरलेला माउल्यानी दिलेला कोबंडा बोकडाचा व लोकवर्गनीतुन घेतलेला बोंकडांचा बळी देत भंडारा करण्यात येतो व संध्याकाळी सर्व ग्रामस्थाना पाऊने रावळ्याना गावात जेवण दिल जात... 


दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरुन मागितलेल्या कमारीचे, शेंगदाने, प्रसादाचे सर्वाना समान वाटप करून कार्यक्रम पार पडतो.

अशा प्रकारे खुप छान आदिम पध्दतीने प्रकृति पुजण आदिवासी कुलदैवत डोंगर्यादेव कार्यक्रमाची सांगता होते.


आदिवासी समाज हा निर्सगपुजक व प्रकृती पुजक आहे आणी तो आदि काळापासुन निसर्गगाच्या खुशीतच जन्मलेला आहे म्हनुन तो जल, जंगल, जमीन, निर्सगाची पुजा करत आला आहे,


त्यात आदिवासी कुलदैवत म्हणुन डोगर्यादेव हा सण सर्वात मोठा सण मानला जातो...निर्सगाचे आभार व्यक्त करण्यासाठी तसेच निसर्गदेवाचा कोप होवु नये, घरात शेतात बरकता यावी  सुख-समृध्दी कणीकणसरा यावी यासाठी पुर्वजानपासुन रुढीपरंपरे नुसार  सर्वात मोठा सण साजरा केला जातो.

 

तरी या पुढे ही डोंगर्यादेव हा सण असच साजरा व्हावा आणि आपली आदिवासी पंरपरा अशीच  टिकुन रहावी या साठी युवां पिढिने पुढाकार घ्यावा...व आपली पंरपरा टिकवुन ठेवावी... 

                                                                                          जय आदिवासी

  

✒️मा.आदि.कृष्णा बी पवार ( रवळजी_कळवण ) 

( K. A ग्रुप _ आदिवासी शक्ति सेना कळवण तालुका अध्यक्ष )



Post a Comment

0 Comments

झाले