आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
जळगांव दिनांक १२ डिसेंबर २०२१ वार रविवार रोजी नायगांव ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथे एकलव्य संघटनेचे छोट्या खाणी रावेर लोकसभा विभागाचे पद नियुक्ती व सत्कार समारंभाचे कार्यक्रम एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या उपस्थित संपन्न झाले.
ह्या वेळी एकलव्य संघटना जळगांव रावेर लोकसभा उप जिल्हाध्यक्ष पदी श्री.संजयभाऊ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष पदी श्री.सुरेश मोरे सर व तालुका उपाध्यक्ष श्री.दिनेश गायकवाड सर तालुका सचिव पदी श्री.भगवान भिल सर तालुका कार्याध्यक्ष श्री.पुरुषोत्तम मोरे कोषाध्यक्ष श्री.तुकाराम भिल युवा तालुकाध्यक्ष श्री.गणेश मोरे तालुका सोशल मिडिया प्रमुख श्री.गोविंदा वाघ तालुका सदस्य श्री.करण धुलकर यांची निवड करण्यात आली.
ह्या छोट्या खाणी कार्यक्रमाला मुक्ताईनगर रावेर बोदवड जामनेर भुसावळ ह्या ठिकाणाहून प्रमुख कार्यकर्ते व नायगांव गावातील आदिवासी भील समाज बांधव त्यासोबत जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.संजुबाबा सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे रावेर लोकसभा जळगांव जिल्हाध्यक्ष श्री. निवृत्ती पवार युवा कार्याध्यक्ष श्री. समाधान जाधव जामनेर तालुका अध्यक्ष श्री.विलास मोरे जामनेर तालुका उपाध्यक्ष श्री. दिपक सोनवणे जामनेर तालुका कमिटीचे श्री.समाधान सोनवणे श्री.कृष्णा जाधव श्री.सुक्राम मोरे श्री.सोपान भिल श्री.गोविंदा भिल आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांची प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन ही करण्यात आले.
अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें
https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial
ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇
आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -
https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार