आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
बिरसा फायटर्स संघटनेच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशिल शिक्षित युवक यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा फायटर्सने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्विकार हि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते.
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व संघर्षवादी संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या संघटनेची निर्मिती झाली आहे.
बिरसा फायटर्स संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महानिरीक्षक पदी दादाजी बागुल सर तर राज्य सचिव संजय दळवी सर यांची निवड आज २१ डिसेंबर २०२१ रोजी बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.सुशीलकुमार पावरा सर यांच्या बागलाण येथील बैठकीदरम्यान नियुक्ती पत्र देऊन घोषणा करण्यात आली.
यावेळी उपस्थित बिरसा फायटर्स संघटनेचे नाशिक जिल्हा शाखा, बागलाण तालुका शाखा, मालेगाव तालुका शाखा, सवंदगाव गाव शाखा तसेच करंजगव्हाण गाव शाखा व पदाधिकारी हिरालाल गायकवाड, विजय सहारे, उमाकांत कापडणीस, सुभाष सोनवणे मालेगाव, सुभाष सोनवणे बागलाण, अमोल पवार, ज्ञानेश्वर मोरे, सचिन सोनवणे, कृष्णा पवार, भाऊसाहेब माळी, गणेश माळी, चंदु पवार, जिभाऊ गायकवाड, रोहिदास गायकवाड, रमेश गायकवाड, जिभाऊ गायकवाड, अंकुश गायकवाड, लहु गायकवाड, रवि गायकवाड, गोकुळ गायकवाड तसेच जनकल्यान पार्टीचे पदाधिकारी छोटू दळवी, भरत बोरसे व निलेश दिपक देवरे वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक व लहुजी शक्ती सेनेचे तालुका उपाध्यक्ष, प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव सर जिल्हा प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी व अरविंद सोनवणे (तात्यासाहेब) इत्यादी सामाज बांधव व मान्यवर उपस्थित राहून संस्थापक अध्यक्ष पावरा सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार