भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !



- डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे प्रतिपादन 

प्रतिनिधी : विदर्भ

साकोली ( ०२ डिसेंबर ) : " भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बाबासाहेब  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी सात सदस्यीय मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे जे सर्वोच्चनुपम तथा राष्ट्रप्रेमाचे कार्य केले त्याला तोड नाही. तळागाळातील उपेक्षित, दुर्लक्षित, दबलेल्या , दाबलेल्या मानवी समूहांना संविधानाने माणूस म्हणून गौरविले आहे; जे या पूर्वी कधीही घडले नव्हते. १९१९ चा सायमन कमिशन , १९३५ चा भारतीय कायदा  यामध्ये  बाबासाहेबांनी कायदेतज्ज्ञ म्हणून बजावलेली कामगिरी महत्त्वपूर्ण आहे; भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय. " , असे कवी- साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत , नाट्य-चित्रपट अभिनेते तथा महानाट्यकार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले. 


भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !


ते विशेष मार्गदर्शक या नात्याने बोलत होते. एशियन न्यूज चॅनेल आणि समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे समारंभपूर्वक आयोजन ज्येष्ठ कादंबरीकार अ. शि. रंगारी यांचे अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती सभागृह, साकोली येथे करण्यात आले होते.


भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !


या समारंभाचे उद् घाटन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एफ. कोचे यांचे मंगलहस्ते करण्यात आले. उद् घाटकीय भाषणात , " डॉ. आंबेडकरांच्या एकूण कार्यकर्तृत्वात, चळवळी आणि आंदोलनांमध्ये आंबेडकरांचे ' संविधान निर्माण म्हणजे राष्ट्रनिर्माण ' हे कार्य मूळातच माणसे प्रकाशनाचे कार्य होय. "असे वक्तव्य कोचे यांनी केले. "  तर याच प्रकाशाच्या वाटेनं चालताना , मार्गक्रमण करतांना संपूर्ण प्रज्ञानता , विधायकताप्रणित मानवता आपण जोपासली पाहिजे; खरे तर हीच आम्हा भारतीयांची संविधाननिष्ठा ठरेल. " अशी आश्वासक भूमिका ज्येष्ठ कादंबरीकार अ.शि. रंगारी यांनी समारंभाध्यक्ष म्हणून अभिव्यक्त केली.


भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !


युवा व्याख्याते तथा कवी प्रा. राहूल तागडे यांनी विशेष मार्गदर्शक म्हणून बोलताना , " भारतीय संविधानात अनुस्यूत असलेल्या स्वातंत्र्य, समता , बंधूभाव तथा भगिनीभाव या मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापणेतूनच सांसदीय लोकशाही , धर्मनिरपेक्षता , सर्वकष समाजवाद या सारखी व्यापक संकल्पनामूल्य भारतीय समाजमनात , भारतीय नागरिकांच्या सार्वत्रिक आचारसंहितेत  अवतरतील ; हे जेव्हा नैतिक आणि सम्यक भावनेतून होईल तेव्हाच कुठे धर्म, भाषा, वंश , लिंग, प्रांत , जात आदी वादांमधे अडकलेला भारतीय माणूस मुक्त होईल, त्याच अर्थाने भारतीय संविधान हा मानवमुक्तीचा वैश्विक जाहीरनामाच बाबासाहेब, डॉ. आंबेडकरांनी प्रसूत केला आहे; या पोटतिडकीच्या शब्दात त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ऍड . प्रभाकर बडोले यांनी संविधान सभा ,मसुदा समितीच्या ऐतिहासिक राष्ट्रीय कार्याबरोबरच  सद्यकालीन देशपरिस्थितीचे विश्लेषण आपल्या तडाखेबंद भाष्यशैलीत केले.


भारतीय संविधान म्हणजे भारताची एकता आणि भारतीयांची प्रतिष्ठा होय !


याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विचारमंचावर केंद्रीय स्टॉफ ऑफिसर गजेंद्र गजभिये , सरकारी वकील ऍड. सुरेश रामटेके , ऍड. स्मिता मेश्राम , सामाजिक कार्यकर्त्या कल्पना सांगोळे , माजी सचिव घनश्याम राऊत , सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम आदी मान्यवरांनी समारंभाचे महत्त्व लक्षात घेऊन औचित्यपूर्ण भाष्यविवेचन केले. 


या कार्यक्रमस्वरूप २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन समारंभाची सूतोवाच भारतीय संविधानाच्या उद्देशिकीच्या सामुहिक प्रकटवाचनाने तथा तद्नुषंगीक मनोमन वचनबद्धतेने करण्यात आली.  व्याख्यानसत्रानंतर सायंकालीन दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार ' मनोजबाबू - भावेशबाबू ' या दुक्कल कोटांगलेबंधूंच्या  बुध्द- आंबेडकरी गीतप्रबोधनाच्या कार्यक्रमाचे खासमखास आयोजन करण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक, एशियन न्यूज चॅनेलचे मुख्य संस्थापक - संपादक डी. जी. रंगारी यांनी तर पहिल्या व दुसऱ्या सत्राचे बहारदार सूत्रनिवेदन अनुक्रमे चिरंजीव बारसागडे व न्यूज एंकर स्वाती रंगारी यांनी केले.


या समारंभपूर्वक कार्यक्रमाच्या  एकूणच यशस्वितेसाठी शीलवान रंगारी , अश्विन रंगारी , शुभम खांडेकर , पुजा वासनिक , सोनू राऊत , माया मेश्राम , बादशाह मेश्राम , कविता मळामे , प्रतिमा राऊत , ज्योती शाहारे , नामदेव कान्हेकर आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.





अब आदिवासी युवा फेसबुक और टेलीग्राम पर उपलब्ध नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और आदिवासी युवा के साथ अपडेट रहें


फ़ेसबुक लिंक 

https://www.facebook.com/AdiwasiYuvaOfficial


टेलीग्राम लिंक

https://t.me/AdiwasiYuva


ऐसे और पोस्ट देखने के लिए और आदिवासी युवा से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

आदिवासी युवा से जुडने के लिए सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य ID कार्ड प्राप्त करे -

https://kutumb.app/aadiwasi-yuva-group?slug=d1e5625e990d&ref=ZO9PO


Post a Comment

0 Comments

झाले