आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
दिपक दशरथ भिल (अहिरे)
संस्थापक अध्यक्ष.भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तथा नगरसेवक न.प.शिंदखेडा
शिंदखेडा:- आज दिनांक 20-12-2021 रोजी लखमापुर ता.सटाना येथील आदिवासी महिला व पुरुष मजुरांना मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याबाबत मा तहसिलदार साहेब शिंदखेडा यांना भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटने कडून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, या एक दोन वर्ष पासून महाराष्ट्रात आदिवासी समाजावर अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे दिनांक 17-12-2021 रोजी लखमापूर गावातील काही गावगुंड समाजकंटकांनी तेथील कारागिल वस्तीत राहणारे आदिवासी महिला व पुरुष मजुरांना गाडी अडवून मारहाण करण्यात आली या समाजकंटकांना तात्काळ अटक करून अनुसूचित जनजाति एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावे व आरोपींना कठोर शासन करावे.
संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय होत आहेत तरी महाराष्ट्र सरकार व महा विकास आघाडीने हा सर्व अन्याय-अत्याचार लक्षात घेऊन तात्काळ आदिवासींवरील अन्याय थांबवावे अन्यथा आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. व काही अनुचित प्रकार घडल्यास सरकार व प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनात महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकानी झालेल्या आदिवासी वरील अन्याय व अत्याचार बाबततही म्हटले आहे
१) दभाशी ता.शिंदखेडा जि.धुळे येथे राजेंद्र भिल यांना त्यांच्या शेतात जाऊन मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आलेली आहे त्यावर आत्ता पर्यंत आरोपींना नरडाणा पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही
२) सुरवाडे या.शिंदखेडा जि.धुळे शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या अधिक्षक श्री वाघ यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी
३) तळवाडे ता.मालेगाव जि.नाशिक येथील आदिवासी भिल्ल मजुरांना गावातील काही समाज कंठकानी जुलमी फतुवाकाढुन गावातच काम करावा लागेल.अन्यथा तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही अशी धमकी ही आदिवासी समाजातील मजुरांना देण्यात आलेली आहे अशी धमकी देणाऱ्या समाज कंठकांना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी
४) लखमापूर ता.बागलाण जि.नाशिक लखमापूर कारगिलवस्तीत राहणारे आदिवासी महिला व पुरुष मजुरांना गाडी अडवून मारहाण करण्यात आली समाजकंटकांना तात्काळ अटक करून अनुसूचित जनजाति एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावे व आरोपींना कठोर शासन करावे. व मोका कायदा अंतर्गत व अल्ट्रासिटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा
५)होडदाने ता.साक्री जि.धुळे येथील सिताराम धरक्या भिल यांची शेतीवर कब्जा करणाऱ्या धनदांडगा व समाज कंठका विरोधात निजामपूर पोलिस स्टेशन यांनी कुठल्याही कार्यवाही केलेली नाही
तसेच निवेदनाच्या प्रति १) मा. अदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र २) मा. जिल्हाधिकारी साहेब धुळे ३) मा. पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांनाही रवाना करण्यात आल्या.
सदर निवेदन देण्यासाठी मा. दिपक दशरथ भिल (अहिरे) संस्थापक अध्यक्ष.भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तथा नगरसेवक न.प.शिंदखेडा, अशोक सुकलाल सोनवणे जिल्हा सचिव भिल समाज विकास मंच, गणेश आप्पा सोनवणे संस्थापक सदस्य, चंदु सोनवणे, शाम ठाकरे, अशोक मालचे, सुनिल सोनवणे, कालु मोरे, संजु मोरे, नामदेव भुषण ठाकरे, दिनेश सोनवणे, अशोक महाले, शंकर पवार, अनिल मालचे, बुधर ठाकरे, सनी महाले, अशोक भिल इत्यादि भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार