अधिवेशनाच्या पहील्या दिवशी राज्यातील विधानसभा सुरू मिनी विधानसभा बंद

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




राज्यात ग्रामपंचायतचा कारभार बंद ठिकठिकाणी आंदोलन

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

मुंबई प्रतिनधी -सरंपच परिषद मुंबई महाराष्ट्र ने पुकारलेल्या ग्रामपंचायत बंदला राज्यात एकमुखी पाठिंबा मिळाला सर्व गावगाडा चालविणाऱ्या आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते त्याच ग्रामसेवकांच्या सर्व संघटनांनी ,संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांनी या संपाला पाठिंबा दिल्याने राज्यातील ग्रामपंचायत चा कारभार पुर्ण पणे बंद राहीला राज्याच्या विधानसभेचे कामकाज सुरू असतांना गावच्या मिनी विधानसभा बंद असल्याचे चित्र होते.


सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाउ काकडे यांनी सरकारकडे १८ मागण्याचे निवेदन दिले होते या मागण्यावर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर ग्रामपंचात बंद ठेवत असल्याचा इशारा देण्यात आला होता. आज सोलापूर जिल्हयातील बार्शी या ठिकाणी सरपंच परिषदेच सरचिटणीस या नेतृत्वात सकाळी ८ वाजता आदोलनांची सुरूवात झाली 


  1. परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाउ काकडे यांनी बीड जिल्हयातील कडा येथे रॅली
  2. काढत काळे झेडे दाखवत या आंदोलनाचे नेतृत्व केले तर सरपंच परिषदेच्या सर्व विश्वतांनी राज्यभर
  3. आंदोलन केले. 
  4. पंधराव्या वित्त आयोग हा शाश्‍वत विकासावर खर्च करावा त्यात कपात करण्यात येउ नये,
  5. राज्यात ग्रामपंचायत मध्ये पॅनल बंदीचा कायदा करावा, 
  6. पिण्याच्या पाण्याच्या योजनाच्या लाईट बिलांची दुरूस्ती करावी, 
  7. नवी मुंबईत सरपंच भवन बांधावे,
  8. पंचवीस पंधराचा निधी शिफारशीवर न देता गावची लोकसंख्या व गरजेवर देण्यात यावा, 
  9. संगणक परिचालक हा ग्रामपंचायतचा कर्मचारी समजण्यात यावा ,
  10. प्रत्येक विभागातून सरपंच पिरषदेचा एक विधानसभेवर आमदार नियुक्त करावा, 
  11. सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी, 
  12. कोरोना काळात निधन झालेल्या सरपंचाच्या कुटूंबियांना मदत करावी, 
  13. सातारा तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायत चे खाते बंद केले ते पुन्हा सुरू करावे 


या सह इतर मागण्या केल्या होत्या सरकारने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील ग्रामपचायत बंद होत्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने गावच्या गावकारभाऱ्यानी केली आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा ईशारा देण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments

झाले