आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जलगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगाव:- आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ वार शुक्रवार रोजी एकलव्य संघटना प्रदेश अध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.संजय सोनवणे रावेर लोकसभा जळगांव जिल्हाध्यक्ष मा.निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष मा.मंगल सोनवणे जळगांव शहराध्यक्ष मा. राहुल ठाकरे तालुका सल्लागार मा.भानुदास गायकवाड यांच्या उपस्थितीत जळगांव पोलीस अधीक्षक साहेब व जळगांव जिल्ह्यातील एरंडोल, भडगांव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगांव, धरणगाव, तालुक्यातील पोलीस निरीक्षक साहेब यांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात आज निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की देण्यात आले दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढुन व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना सर्व मजुर वर्गाला काही संवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडवून तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. असे धमकाविले व त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधीत जमावाने मारहाण केली होती.
आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रा.पं.पदाधिकारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक सरपंच यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ कायद्या अंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत. करीता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करावे असे निवेदनात म्हटले आहे.
ह्या वेळी एकलव्य संघटनेचे वेगवेगळ्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष व तालुका कमिटीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार