महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी डी जी रंगारी

आदिवासी युवा





एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

साकोली 25 डिसेंबर महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा तर्फे महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका शाखा कार्यकारिणी गठीत करण्याकरिता भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका साकोली शाखेचे गठण करण्याकरता बैठक आयोजित करण्यात आलेली होती.


याप्रसंगी पहिले चे तालुका अध्यक्ष धार्मिक गणवीर यांच्या कोविड मुळे निधन झाल्यानंतर तालुका अध्यक्षपदाची जागा रिक्त होती त्यामुळे फार मोठी अडचण निर्माण झाली होती आज विश्रामगृहात साकोली येथे तालुका कार्यकारणी गठण करण्याकरता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या रिक्त जागेवर महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका साकोली च्या अध्यक्षपदी पत्रकार डी जी रंगारी यांची सर्व संमतीने नियुक्त करण्यात आली.


त्याच प्रमाणे सचिव म्हणून अश्विन रंगारी कोषाध्यक्ष म्हणून शीलवान रंगारी सहसचिव म्हणून स्वाती रंगारी व सदस्य म्हणून शुभम खांडेकर यांची जिल्हा अध्यक्ष शिवशंकर टेभरे यांनी बैठकीत घोषणा केली. 


तालुका अध्यक्ष डी जी रंगारी यांचा पुष्प गुच्छ देऊन जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

झाले