विदर्भात बिरसा फायटर्स शाखांचे मा.आश्रृबा नवले यांच्या हस्ते उद्घाटन...

आदिवासी युवा




'तरूण तर्क व म्हातारे अर्क' असा धुमधडाक्यात' उलगुलान जारी है! जारी रहेगा! -सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बि.एफ.विदर्भ प्रदेश 


एसके जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ



लोणार:- (२६ डिसें.) विदर्भात तरूण व वॄध्दांनी बिरसा मुंडाचे जल, जंगल, जमीन या ञिसुञीचे विचार आत्मसात करीत जिल्हा बुलढाणा मौजा मढीत बिरसा फायटर्स आदिवासी संघटन शाखेचे अनावरण करून धरतीआबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे लोंखडी बोर्ड लावून रीतसर पूजन करून सर्व समाजासमोर धरतीआबा बिरसाचा जसा आदर्शच ठेवला आहे.




या शुभप्रसंगी उदघाटक श्री. आश्रृबा निवृती नवले, मा.सुरेश कुमार पंधरे प्रांताध्यक्ष विदर्भ व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा (ऑनलाईन विडिओ काॅल ने), राज्याध्यक्ष- मनोज पावरा, राज्यउपाध्यक्ष-राजेश धुर्वे(ओझा) प्रमुख उपस्थीत व बुलढाणा जिल्हाध्यक्ष एकनाथ लाखोळे, एकनाथ आ धोञे, लोणार तालुकाध्यक्ष दत्तराव डाखोरे, मणी शाखाध्यक्ष कान्हू भ.दुभळकर, मढी उपाध्यक्ष रामेश्वर बा.धाटे, सदस्य महादा धाटे, अशोक धाटे, अशोक तनपुरे, कुंडलिक धाटे, अर्जुन धोञे, महादेव धाटे, जनार्धन तनपुरे, गजानन धोञे, काशीनाथ धाटे, तुकाराम धाटे, शंकर डाखोरे, इत्यादी पदाधिकारी व समाजबांधव या प्रसंगी उपस्थीत होते.


याप्रसंगी ऑनलाईन समाज संघटनच्या  संवेधानिक मार्गानेच नियुक्त्या कराव्यात. व कर्तव्य जबाबदार्या सांगण्यात आल्या. समाजावर होणार्या अन्यायाविरूध्द सर्वानी एक होत 'एक तीर एक कमान सब आदिवासी समान हा नारा' देत, सर्वांना समानतेचा न्याय देत कर्तव्य पुर्ती करा. 


गावात मतभेद असू नयेत. सर्व संस्कार पिठावर श्रेष्ठजेष्ठांना घेवून कार्य करावे उद्घाटनप्रसंगी ऑनलाईन सुरेश कुमार पंधरेंनी फोन काॅम्फ्रंन्सवर म्हटले आहे.


संस्थापक व विदर्भ पदाधिकार्यांचे ताळमेळ बसवून नियुक्ती  करण्याचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी एका संदेशात म्हटले आहे. कोनतीही दोनदा नियुक्ती होवू नये. वाटल्यास योग्य कामा ची पावती म्हणुन बढती देता येईल व वरिष्ठांशी समन्वय साधून संघटनेला उभारी द्या.असे विदर्भ प्रांताध्यक्ष सूरेशकुमार पंधरे यांनी सुध्दा ऑनलाईन फोन काॅलने कळविले आहे.




Post a Comment

0 Comments

झाले