सर्व समाज संघटनांनी एकत्र येत आदिवासी धर्मासाठी संकल्प करा- सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ प्रदेश
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
तुमसर (२९ डिसें) गोंडवाणा गोटुल समाज समिती व बिरसा फायटर्स शाखा लोहारा येथे कोया पुनेम सम्मेलण गोंडी झेंडा पुजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमा प्रसंगी आदिवासी संज्ञा नसून एक समाज संस्कृती आहे व ती जल जमीन व जंगलावर अवलंबून आहे असे याप्रसंगी उदघाटक सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स / समन्वयक सरपंच परिषद मुंबई उपस्थीत जनसमुदायाला संबोधित केले.
यावेळी अध्यक्ष - शामरावजी ऊईके कॄषी अधिकाऱी (से नि ) सल्लागार जि गोंदिया बिरसा फायटर्स व हुयुमन संरक्षण परिषद पी बी कंगाले, जिल्हाध्यक्ष भंडारा, सुभाष धुर्वे, नरेंद्र कुंभरे सरपंच लोहारा, मुन्ना सलामे महासचिव/ह्युमन संरक्षण परिषद तिरोडा, लिलाधर चांदेवार अध्यक्ष तुमसर बिरसा फायटर्स, कैलासजी उईके, इत्यादीं पदाधिकारी गोटुल संस्कार पीठावर विराजमान होते.
पुढे पंधरेनी उद्घाटक म्हणुन आदिवासी या शब्दाचा अर्थ विशद करताना "आधीपासून प्राचीन काळापासून या भूमीवर वास्तव्य करणारे एका समान भाषेचा वापर करणाऱ्या एकाच पूर्वजांपासून उत्पत्ती सांगणाऱ्या एकाच पूर्वजांपासून उत्पत्ती सांगणाऱ्या एका विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तंत्र शास्त्रीय रक्तसंबंधावर आधारित सामाजिक राजकीय रितीरिवाज यांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एक जिनशी गट म्हणजे आदिवासी.
आदिवासी ही एक केवळ संज्ञा नसून एक संकल्पना आहे ती एक संस्कृती आहे निसर्ग संस्कृती असून श्रम, समुह आणि सहकार्या वर आधारित समता व ममता जपणारी अशी निसर्ग चक्राशी तादत्म्य पावलेली अशी शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करणारी संस्कृती असून या संस्कृतीचे पायाभूत घटक म्हणजे समता, सामूहिक त्या निसर्गाशी दैनिक नाते श्रमप्रतिष्ठा सीमित गरजा धर्मरहित लोकसंस्कृती हे होय.
धर्म हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे अलौकिक विधी नसणारी एकही आदिवासी धर्माचा अभ्यास करण्याच्या संदर्भात टायलर प्रेजर मँलीनोक्सी या सामाजिक मानव शास्त्रज्ञांनी अभ्यासपुर्ण चिकित्सक मांडणी केलेली आहे.
आदिवासी समाज निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्यामुळे निसर्गा बद्दल त्यांच्या मनात आदर युक्त भिती आहे आदिवासीं च्या धर्मश्रध्देत सर्वात्मकवाद जादू टोना तंत्र मंत्र प्रेतांच्या भूत-पिशाच्च देव ई. प्रकार सामावलेले असतात.
धर्म आदिवासीच्या सामाजिक जीवनातील नियंत्रणाचे साधन आहे. आदिवासी लोकांच्या आचार विचारात जीवनविषयक दृष्टिकोन समानता दिसून येण्याचे कारण धर्म आहे.
समाजबांधवाशी चर्चा केली. असे अनेक मान्यवरांचे समाज विकास व धर्मासंबंधात भाषणे झाली.
प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष व संचालण समारोप लिलाधर चांदेवार यांनी मानले. मध्येच पाऊस आल्यामुळे कार्यक्रम आवरता घेण्यात आला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार