ग्रीनफ्रेंड्स तर्फे वृक्षारोपण करून डॉक्टर दाम्पंत्याचा वाढदिवस साजरा

आदिवासी युवा




लाखनीचे सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. मनोज आगलावे व डॉ. मीरा आगलावे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून एकत्रितरित्या साजरा


एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर  क्लब चे हितचिंतक व ग्रीनफ्रेंड्सच्या विविध उपक्रमांना उदारहस्ते सहकार्य करणारे लाखनी येथील (जि. भंडारा) सिद्धिविनायक हॉस्पिटल चे संचालक व सुप्रसिद्ध स्त्रीरोग चिकित्सक डॉ. मनोज आगलावे (26 डिसेंम्बर) तसेच त्याच्या सहचारिणी व स्त्रीरोग चिकित्सक डॉ मीरा आगलावे (25 डिसेंम्बर) यांचा वाढदिवस एकत्रितपणे 26 डिसेंम्बर ला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये वृक्षारोपण करून अभिनवरीत्या  साजरा करण्यात आला.यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य,ग्रीनफ्रेंड्सचे सचिव प्रा. अशोक गायधने,सहसचिव पंकज भिवगडे, कोषाध्यक्ष योगेश वंजारी तसेच पदाधिकारी मंगलजी खांडेकर से.नि. शिक्षक ,आराध्या आगलावे  तसेच सिद्धीविनायक हॉस्पिटलचा  नर्स स्टाफ उपस्थित होता.कार्यक्रमाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था व मानवता विकास संस्था   (नेफडो) जिल्हा भंडारा व अ भा अंनिस तालुका शाखा लाखनी  जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.


यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे सचिव प्रा.अशोक गायधने यांनी प्रास्ताविक करताना वाढदिवशी वृक्षारोपण ही संकल्पना लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स तर्फे कशी राबविली जाते यावर माहिती दिली.ग्रीनफ्रेंड्स च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वृक्षभेट देऊन डॉक्टर दाम्पंत्याना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम संचालन अशोक वैद्य तर आभार प्रदर्शन पंकज भिवगडे यांनी केले.

🌱🌳🌱🌳🌱🌱🌳🌱🌳🌱

Post a Comment

0 Comments

झाले