बौध्द क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्री, शिक्षणमंञी, धुळे शहर आमदार, धुळे जिल्हाधिकारी, यांना निवेदन सादर.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी:- मद्रास पावरा नंदुरबार

विषय - डाॅ बाबासाहेब आंबेडकर चरिञ साधने समितीचे सर्व खंडाचे विक्री केंद्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हा वाचनालय व तालूका वाचनालय येथे सुरू करने संदर्भात महाराष्ट्र विधिमंडळात येत्या अधिवेशनात ठराव संमत करा.


महाराष्ट्र सरकारने 06 डिसेंबर 1982 रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर चरिञ साधने समिती स्थापन केली आहे. समिती स्थापनेचा मुख्य उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासहित जी हजारो पुस्तक लिहीली ती सर्व भारतीयापरयंत माफक दरात पोहचवने हा निर्धारित करण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद याठिकाणी असलेल्या शासकीय प्रिंटीग प्रेस मधे या ग्रंथाचे प्रिंटीग होत असते. तेथे ति विक्री साठी उपलब्ध असतात. 


दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचया महापरिनिरवानदिनी 06 डिसेंबर ला चैतयभुमी, दादर, मुंबई येथे व अशोका विजयादशमीच्या धममचक्रपरिवरतन दिनी दिक्षाभुमी, नागपूर येथे चरिञ साधने समिती तर्फे शेकडो ट्रक भरून बाबासाहेबांची ग्रंथ संपदा विक्री साठी आणल्या जाते त्यातून शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळतो. 


महोदय  दिक्षाभुमी व चैतयभुमी ही जगाच्या पाठीवर अशी ठिकाणे आहेत की जेथे करोडो लोक पुर्ण भारतातून तसेच जगभरातुन भेट द्यायला येत असतात व ही संख्या दरवर्षी वाढते आहे. 


महोदय ज्या पध्दतीने वर नमुद पाच शासकीय प्रिंटीग प्रेस मधे बाराही महीने बाबासाहेबांची ग्रंथ संपदा विक्री साठी उपलब्ध असते अश्याच पध्दतीने प्रत्येक जिल्हा वाचनालय व तालूका वाचनालय येथेही ती सर्व लोकांकरिता उपलब्ध करून द्यावी त्यातून सर्व लोकांना ते साहीत्य सहजगत्या उपलब्ध होईल. 


तरी आपण या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा व राईटींग अॅणड सपिचेसचे खंड सर्व बहुजनांना उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र कायदेमंडळात कायदा करावा ही विनंती. 




उपरोकत विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना सादर केले आहे. 


डाॅ श्रीकृष्ण बेडसे, अर्जुन अण्णा भोई, नितीन महसदे, मोहम्मद जैद, इंजी. राजदीप आगळे, मल्हार वाघ.


Post a Comment

0 Comments

झाले