बहुतांश आदिवासींचा इतिहास जगासमोर उशिरा का होईना पण येत आहे

आदिवासी युवा




✍ भुपेंद्र देवरे 

आ.ए.प.शिंदखेडा सहसचिव 


आज कामानिमित्त निजामपूर येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींची शाळेत गेलो असतांना. मुख्याध्यापक कार्यालयाच्या भिंतीवर "क्रांतिवीर तंटया भिल" यांचे रेखाटलेले चित्र पाहिले. बहुतांश आदिवासींचा इतिहास जगासमोर उशिरा का होईना पण येत आहे.




भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक ''भिल शूरवीरांचा इतिहास'' आहे. भारतातील मध्यप्रदेश राज्यात इंग्रजांच्या जुलूमशाही व वाढत्या सावकारांच्या सावकरपणाला कंटाळलेले लोक ही तंट्या भिल यांच्याकडे न्याय मागत असे. भारतात जहागीरदार, जमीनदार, अमीर-उमराव, सावकार या लोकांनी जनतेची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात सुरू केली होती. लोकांना विविध प्रकारे कर लावून त्यांची पिळवणूक करून पैसा, जमीन, शेती बळकवणे मोठ्या प्रमाणात चालू होते. 


अशातच लोकांना या त्रासापासून क्रांतिकारक विचारांचा "तंट्या भिल्ल हा क्रांतिवीर" मदतीस पुढे आला. भांडण तंटे मिटवणे, गरिबांना मदत करणे, सावकाराकडून सक्तीचे जबरन वसुली पासून वाचवणे इत्यादी कामांमुळे जननायक हा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत गेला 'संपूर्ण निमाड क्षेत्रात' त्याला "जन नायक म्हणून लोक संबोधू" लागले. 


न्यूयॉर्क टाइम्सच्या 10 नोव्हें-1889 Robin Hood Of India असे वर्णन करण्यात आले होते. 4 डिसें-1889 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.


महत्त्वाचे म्हणजे भिल समाजाने जल, जंगल, जमीन व देश संरक्षणासाठी नेहमी बलिदानाची भूमिका बजावलेली असतांना त्यांच्या क्रांतिवीरांची व भिल्लांचा इंग्रजांविरुद्ध उठावांची कुठल्याही राज्याच्या अभ्यासक्रमात समावेश नसल्यामुळे निराशा वाटते...


              

Post a Comment

0 Comments

झाले