आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
मा तहसीलदार कार्यालय शिरपुर जिल्हा धुळे
शिरपूर:- विषय: पुरवठा अधिकारी व अव्वल कारकून यांच्या वर नागरीकांची सनदी नुसार व दमर अधिनियम प्रमाणे कार्यवाही होणे बाबत..
अर्जदार: हिम्मत हिलाल दाभाडे,
शिरपूर जिल्हा धुळे आदिवासी विकास परिषद दिल्ली
20 जुलै 2020 रोजी राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी निर्मिती केलेले आदिवासी बांधवांसाठी विनामूल्य रेशन कार्ड आधार कार्ड जात प्रमाणपत्र इत्यादी योजनांच्या समाविष्ट असलेला राज्य सरकारने जीआर काढलेला असून त्या अनुषंगाने शिरपूर येथे आदिवासी बांधवांनी नवीन रेशन कार्ड साठी अर्ज सादर केले होते.
तरी त्यांचे दोन महिने झाल्यावर पण त्यांना रेशन कार्ड मिळाले नाही कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही यांना कारणीभूत नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी व अव्वल कारकून जबाबदार असून यांच्या आळमुठे मुळे वैद्यकीय सुविधा अन्नधान्य व भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी फ्री रेशन वाटप योजनेचा लाभ मिळालेला नसून यांच्यावरती दप्तर अधिनियम प्रमाणे रेशन कार्ड कालावधीत न देणे अशी गंभीर स्वरूपाचे वर्तन केले. असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे व त्यांना वैद्यकीय लाभा पासून वंचित ठेवले असून सदर आदिवासी बंधूंना ताबडतोब रेशन कार्ड देण्यात यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून उपोषणास बसण्यात येईल.
याला सर्वस्वी जबाबदार मा.तहसीलदार आबा महाजन शिरपूर तहसीलदार जिल्हा धुळे यांची राहील असा इशारा हिम्मत दाभाडे सामाजिक कार्यकर्ता यांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक जिल्हाधिकार्यालय धुळे उपविभागीय कार्यालय शिरपूर यांना देण्यात आल्या आहेत.
आदिवासी बांधवांसाठी विनामूल्य रेशन कार्ड वेळेवर न दिल्यामुळे जिल्हाधिकार्यालय धुळे उपविभागीय कार्यालय शिरपूर यांना निवेदन देण्यात आलेhttps://t.co/wOmKCrTRFH
— आदिवासी युवा 🏹 (@Adiwasi_Yuva) December 16, 2021

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार