सरपंच परिषद थेट दिल्ली दरबारी...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





ग्राम विकास मंत्री गिरिराज सिंह यांच्यासमोर मांडल्या गावच्या समस्या वित्त आयोग निधीच्या खर्चाबाबत चर्चा -


दत्ताभाऊ काकडे 

मुंबई सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे 25 प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ 8 रोजी दिल्लीमध्ये दाखल झाले होते ग्राम विकास मंत्रालयात केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह, राज्यमंत्री कपिल पाटील सचिव शेटे यांच्यासह अधिकारी या बैठकीला उपस्थित होते  


सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे सरचिटणीस विकास जाधव व 25 जणांच्या शिष्टमंडळात ग्राम विकासाच्या संदर्भात  बैठक संपन्न झाली या बैठकीस शिष्टमंडळातील सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोगातील रक्कमेत राज्य सरकार वेळोवेळी परिपत्रके काढून  कपाती करत आहेत या कपाती करण्यात येऊ नयेत कॉम्प्युटर ऑपरेटर चे मानधन ही वित्त आयोगाच्या रकमेतून न देता ते स्वतंत्र देण्यात यावे व कॉम्प्युटर ऑपरेटर हा ग्रामपंचायतचा कर्मचारी समजण्यात यावा त्याच्या निवडीचे अधिकार ग्रामपंचायत ला देण्यात यावेत वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळाल्यानंतर तो अनेक दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पडून असतो त्यामुळे तो निधी ग्रामपंचायतीला पंधरा दिवसात देणे बंधनकारक करावे चौदाव्या वित्त आयोगातील रकमेवरील व्याज ग्रामपंचायत कडून राज्य शासनाने परत घेतले होते ते व्याजाचे पैसे पुन्हा ग्रामपंचायतला देण्यात यावेत 


कोरना काळात निधन झालेल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी पंतप्रधान घरकुल योजनेतील काही अटी शिथिल करून ते पुन्हा सुरू करण्यात यावेत स्वामित्व योजनेतून गावात प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यात येणार आहेत मात्र गावच्या मोजणीसाठी ड्रोन आणि मनुष्यबळ कमी असल्याने याबाबत ही निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्या केल्या 


मंत्री गिरिराज सिंह आणि मंत्री कपिल पाटील यांनी या  बैठकीत च अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या  सरपंचांनी जास्तीत जास्त कामे एमआरईजीएस मधून घेऊन फळबागांची लागवड करावी यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा दोन्ही मंत्र्यांनी बैठक व्यक्त केली ही बैठक  दिल्ली येथे जवळपास दीड तास चालली  


ही बैठक सुरू असतानाच जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी आल्याने या बैठकीतच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या मागण्या रस्ता असून  या बाबत आपण निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी परिषदेच्या शिष्टमंडळा ला दिले   


यावेळी सरपंच परिषदे चे प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव, प्रदेश विश्वस्त राजीव पोतणीस, आनंद जाधव, प्रसिद्धी प्रमुख बापू जगदाळे, अरुण कापसे, मनिषा यादव, वनिता सुरवसे, प्रतिभा थोरवे,शत्रुघ्न धनावडे, पंडित मिरगणे, बाळासाहेब पोतनीस, अंबादास गुजर, चंद्रशेखर साके,शरद सानप, संदीप देशमुख, बाळासाहेब आव्हाड, रघुनाथ घुले, बाबासाहेब गोर्डे, अविनाश पालवे,चंन्द्रकांत सनस, अनिल ढीकले, तानाजी गायकर, ढगे , यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते





Post a Comment

0 Comments

झाले