ग्रीनफ्रेंड्स तर्फे 'उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कारा' ची घोषणा

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




कु.कोमल परतेकी व कु.श्रुती गाडेगोने यांना सयूंक्तपणे 'उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार' जाहीर

एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

लाखनी:- पर्यावरण क्षेत्रात अग्रगण्याने विदर्भातील नावाजलेल्या ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी जिल्हा भंडारा तर्फे दरवर्षी सक्रिय सर्पमित्र व पक्षीमित्र, निसर्गमित्र यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट निसर्गसेवेबद्दल सत्कार करीत असतात. याच उपक्रमाअंतर्गत या वर्षीचा ग्रीनफ्रेंड्स तर्फे दिला जाणारा 'उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार' सयूंक्तपणे साकोलीचे कु.कोमल घनश्याम परतेकी व कु श्रुती रामप्रकाश गाडेगोने यांना जाहीर करण्यात आला.


याअंतर्गत त्यांना आकर्षक ट्रॉफी, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पक्षीपुस्तक व पारितोषिक रक्कम 3500 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रीनफ्रेंड्सच्या पुरस्कार निवड समितीने एकमुखाने उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार म्हणून या दोघीनी केलेले उत्कृष्ठ कार्य बघून निवड केली आहे. या दोघीनी मागील 3 वर्षात ग्रीनफ्रेंड्सने केलेल्या विविध पक्षीजागृती उपक्रम, पक्षीनिरीक्षण मोहिम स्थानिक व स्थलांतरित पक्षी मोहिमांत सहभागी, तसेच गाव व इतर परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी आवड तयार करणे त्यांना ई-बर्ड वर माहिती देणे, जनजागृती करणे इ- बर्ड वर अद्यावत नोंदी करून भंडारा जिल्ह्यात  प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविणे, 10 दिवसीय पक्षीशिबिर करणे, फुलपाखरांचा अभ्यास करणे, पर्यावरण संवर्धन अनेक उपक्रमात मागील 3 वर्षात सहभाग याबद्दल देण्यात आले आहे असे ग्रीनफ्रेंड्स तर्फे कळविण्यात आले आहे.


लवकरच ग्रीनफ्रेंड्सच्या वार्षिक पक्षी निरीक्षण व पारितोषिक वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या दोघींना पुरस्कृत करण्यात येणार आहे.कु.कोमलने भंडारा जिल्ह्यातच नाहीतर गुजरात येथील गांधीनगर जिल्ह्यात सुद्धा इ-बर्ड पक्षी अँपवर नोंदी करून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. 


या दोघीनी  'उदयोन्मुख पक्षीमित्र' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे आभार मानले आहे. याबद्दल आपले मनोगत  व्यक्त करताना अनेकजण चुकीचे निरीक्षण करून इ-बर्ड अँपवर कशाही नोंदी करतात, त्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण करून इ-बर्ड वर नोंदी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे त्यांनी सांगितले आहे.


नाहीतर बऱ्याच जणांना पक्षी ओळखू येत नाही व इ-बर्ड ऍप वर मात्र सहा महिन्यात 150 पक्षी पाहिल्याची नोंद करून यादी फुगवीत जातात. असा प्रकार न करता प्रत्यक्ष निरीक्षणावर भर देऊन नोंदी करण्याकडे  आम्हा दोघींचा भर असतो असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे. पक्षीउपक्रमासोबत इ-बर्ड अँपवर नोंदीं कशा घ्याव्यात याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेमिनारद्वारे तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात.पक्ष्यांसोबत भंडारा जिल्ह्यात आढळणारे फुलपाखरांचे निरीक्षण व यादीची निर्मिती सुद्धा त्यांचे मार्गदर्शक ग्रीनफ्रेंड्स चे सचिव प्रा. अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करून  तयार करीत आहेत.आतापर्यन्त 70 फुलपाखरांची नोंद त्यांनी यादीमध्ये घेतली आहे. यासोबतच त्यांनी फुलपाखरू सप्ताहात व पक्षीसप्ताहात सुद्धा सहभाग नोंदविला आहे. 


यासोबतच कोमलने सर्पमित्र म्हणून सुद्धा कार्य करताना अनेक सापांना जीवदान, निसर्ग- पर्यावरण, पक्ष्यावर आधारित काव्यनिर्मिती तर श्रुतीने निसर्ग व वैचारिक लेखन आणि जखमी पक्ष्यांवर उपचार केले आहेत.दोघींनी आपल्या यशाचे श्रेय ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य व सचिव प्रा.अशोक गायधने तसेच ग्रीनफ्रेंड्सच्या इतर पदाधिकारी यांना व अनेक निसर्गात प्रत्यक्ष कार्यरत निसर्गमित्र सर्पमित्र यांना दिले आहे.




Post a Comment

0 Comments

झाले