आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी:-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
शिरपूर (कोडीद) आज दि.१६ डिसेंबर २०२१ रोजी उपकेंद्र, कोडीद अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे सिकल सेल जनजागृती सप्ताह शिबीर घेण्यात आले.
ह्यावेळी शालेय मुलामुलींना उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सिकलसेल आजाराबद्दल सखोल माहिती व आरोग्य शिक्षण बद्दल मार्गदर्शन जनजागृती केली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ह्यांनी आरोग्य व शिक्षण ह्याबद्दल सखोल माहिती दिली.
ह्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.डी.पाटील सर, श्री.माळी सर, श्री.शहा सर, श्रीमती भगत मॅडम, शालेय कर्मचारी महाले दादा, रामसिंग पावरा, शांतीलाल पावरा आदी उपस्थित होते.
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे आज सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा...!https://t.co/JnSnhaGGSx
— आदिवासी युवा 🏹 (@Adiwasi_Yuva) December 16, 2021

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार