एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार विभागीय प्रांतकार्यालय चाळीसगांव येथे महत्त्वाच्या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




निवृत्ति भाऊ पवार ( एकलव्य संघटना जलगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )

जळगांव:- आज दिनांक २१ डिसेंबर २०२१ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती जळगांव जिह्यातील चाळीसगांव येथील विभागीय प्रांतकार्यालय चाळीसगांव येथे. प्रांताधिकारी यांना एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. 




एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या

१) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाजद फनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे. 

२) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्या  लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत असून त्यांच्या नाव जागा नाही अश्या लाभार्थ्यांना शासन जिआर नुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावे. 

३) आदिवासी भिल समाज कसत असलेल्या वन जमीन व गायरान जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर नोंद करून मालकी हक्क मिळावा. 

४) आदिवासी भिल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावे. 

५) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल याची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी. 

६) शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध योजनांचा लाभ दोन ते तीन महिन्याच्या आतच देण्यात यावा.

७) लखमापूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक ह्या ठिकाणी आदिवासी मजुरांवर झालेल्या मारहाण घटनेचे निषेध करून आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी 

८) शबरी घरकुल योजनेचा उदिष्ट वाढवून मिळावा 

असे निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना देण्यात आले. 




यावेळी निवेदन देण्यासाठी एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब प्रदेश सल्लागार मा.विनोदराव गायकवाड जळगांव जिल्हाध्यक्ष ( जळगांव लोकसभा ) मा.संजुबाबा युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे जिल्हाउपाध्यक्ष मा.सुरेशराव सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.पिंटूभाऊ गायकवाड चाळीसगांव तालुकाध्यक्ष मा.मोतीदादा पवार व तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments

झाले