शेतकऱ्यांचे चना, तुळ, या पिकाचे भारी नुकसान मजुरांची धडपड थंडीची लाट कायम असल्याने रोगराईला निमंञण.
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (२९(डिसें):- सध्या विदर्भात वातावरणात बदल व अवेळी येणारा बेमौसम पाऊस आल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे दि.२८ पासून पाऊसासह गारपिट पडल्याने थंडीची लाट आली आहे. मोसम विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे सर्व समाज बांधवांनी पालन करावे व आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता पाळावी असे आवाहन सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष विदर्भ बिरसा फायटर्स, राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ अंतर्गत मानव सरक्षंण परिषद महाराष्ट्र राज्य समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांनी प्रसार माध्यमांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
मागील दोन वर्षापासून राहिलेले विवाह तसेच सामाजिक कार्य करतांनी कोरोणा नियमांची एैसीतैसी होवू नये. याची काळजी घ्यावी. थंडीमुळे सर्दी खोकला हे पण सातत्याचे आजार समजून ढिलपणा देवू नये अंगात उलणचे मऊ व जाडेकपडे घालावे व थंडीपासून आपला बचाव करावा असा सल्ला समाज गृप व सोशल मिडीयावर दिले आहे.
या थंडीमुळे जरी कोरोणाचा धोका संभवता नसला तरी माझे मते "प्रीव्हेन्शन इज दी बेटर दँन क्युर " म्हणजेच सर्वाचे दोन लस पुर्ण करा. दि 3 जानेवारी पासून. १५ ते १८ वयोगटातील सर्वांचे ऑनलाईन कोविन ॲपवर नोंदणी करावी असे (आरोग्य विभाग ) ने सरकारने अगोदरच आवाहन केले आहे.
कुणीही बेसावधपणा करू नये व कोरोणाचे सर्व नियम पाळून इतरांना सुध्दा सावध करा असे समाजसेवक सुरेशकूमार पंधरे यांनी म्हटले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार