आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
मा. चिंधू आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल
पुणे जिल्हा: बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षीत कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्वीकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते.
समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे. या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मा श्री निलेश शिवाजी हिले सर यांची निवड आज ११ जानेवारी २०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री डी. बी अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा .चिंधू आढळ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा .विजय आढारी, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्तात्रय कोकाटे सर, जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे जिल्हा उपाध्यक्ष मा .प्रा संजय मेमाणे, जिल्हा महासचिव मा .किरण तळपे, जिल्हा सचिव मा .शशिकांत आढारी खेड तालुका अध्यक्ष मा. सुधीर भोमाळे, खेड तालुका कार्याध्यक्ष मा .संतोष भांगे आंबेगाव तालुका अध्यक्ष मा सुरेश वाळकोळी, उपाध्यक्ष मा. सागर भवारी सर, कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी मावळ तालुका उपाध्यक्ष मा. सखाराम खामकर ,चाकण शहर अध्यक्ष मा. बारकू ठोकळ, संघटक आनंता मेठल इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
तसेच या निवडीचे श्रेय बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ यांना जाते पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार