आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
नंदुरबार (प्रतिनिधी) दि, 8 रोजी शहादा तालुक्यातील चिखली प्राथ. माध्यमिक आश्रम शाळेत युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
शाळा ही माणसाला माणुस म्हणून उभी करते. स्व अस्तित्व, अस्मिता आत्मसन्मान निर्माण करते. आपले हक्क अधिकार शिक्षणामुळेच माणसाला कळतात. त्यामूळे विद्यार्थ्यांनी शाळेत आहे तो पर्यत योग्य ती कौशल्य आत्मसात केले पाहिजे. वाचण, लेखन, खेळ, साहित्य इत्यादी विविध क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटले तरच भविष्यात माणसाची वेगळी इमेज तयार होते. अन्याथा "लेख्या पुण हिक्या नी" अशी गत व्हायला नको. अशा प्रकारे विविध विषयावर मुलांना मार्गदर्शन करत आपल्या कविता देखील कवी संतोष पावरा यांनी सादर केल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.एस्.पाटिल होते. कार्यक्रमाला प्राथमिक मुख्यध्यापक श्री.आर.एस्.पाटिल, एस्.के.ठाकरे, एच्.बी.चव्हाण, खेडकर सर, पी.बी.चव्हाण, राजपूत सर, पवार सर, मौरे मैडम, आप. सुरजित ठाकरे सर चव्हाण मैडम, जाधव सर, पावरा सर. उपस्तीत होते.
सुत्रसंचालन एस. के ठाकरे सरांनी केले तर आभार पी. बी चौहान सरांनी केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार