आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
डॉ.संजय दाभाडे , पुणे ,
9823529505, sanjayaadim@gmail.com
पुणे:- आदिवासींचे धर्मांतर करणे नवशिक्षित आदिवासींना मंजूर नाही. जो तो येतो नी आमच्या आदिवासींना धर्मांतरीत करू बघतो अशी भावना आदिवासी नवमध्यमवर्गात दिसून येते. संघ प्रणित वनवासीकरण असो की अन्य धर्मानंकडून नियोजनबध्दपणे घडवले जाणारे धर्मांतर असो , त्याविरुद्ध हळू - हळू आवाज बुलंद होताना दिसत आहे.
आदिवासींची स्वतःची सांस्कृतिक मूल्ये आहेत. धर्मांच्या आधीची ती संस्कृती नी जीवन पद्धती आहे. जयपाल सिंग मुंडा संविधान सभेत म्हंटले होते की आदिवासींकडून इतरांनी समता - बंधुता हे मूल्य शिकावे.
जनगणनेत स्वतंत्र 'आदिधर्म ' कॉलम मिळावा ही आदिवासींची मागणी पुढे येत आहे. झारखंड विधानसभेने सरणा धर्माच्या कॉलमचा ठराव मंजूर केला आहे. विशेषता हिंदी पट्ट्यात म्हणजे झारखंड , मध्य प्रदेश , छत्तीसगड , ओरिसा , बंगाल , गुजरात , महाराष्ट्र इत्यादी राज्यांतील आदिवासींत आदीधर्मा बद्दल विचारविर्मश सुरू आहे. नॉर्थ - ईस्ट मध्ये इंडीजिनस अशी ओळख आहे.
एकंदरीत आदिवासींना गृहीत धरण्याची प्रवृत्ती सर्वांमध्ये दिसून येते , त्याबद्दल आदिवासींमध्ये तीव्र संताप व चीड व्यक्त होते आहे. आदिवासींचं ब्राम्हणीकरण हे एका स्ट्रोक मध्ये घडत नसून ती एक प्रक्रिया सुरू आहे व अश्या प्रकारे ट्राईब Tribe मधून जातीव्यवस्थे Caste कडे जाणे ( नी ब्राम्हणी गुलामगिरीत बंदिस्त होणे ) ह्यास देखील नवशिक्षित आदिवासींचा विरोध आहे.
ही प्रक्रिया कशी थांबवता येईल ह्याबद्दल गांभीर्याने मंथन होत आहे व देश पातळीवरील आदिवासी अभ्यासक ह्याबद्दल एकत्र येऊन चर्चा करत आहेत.
प्रत्येक व्यक्तीस स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी आदिवासींचे धर्मांतरण करणे ही संघटित धर्मांनकडून सगळ्यांत सोपी व सहज बाब समजली जाते. आता मात्र ते फार सहजपणे घडणार नाही ह्याबद्दल मोठी जागरूकता आदिवासी अभ्यासकांमध्ये दिसून येत आहे.
अलीकडेच जेसिंता केरकट्टा ह्या आदिवासी साहित्यिक व पत्रकार तरुणीने तिला ती ख्रिश्चन असल्याने ख्रिश्चन धर्मा कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार नाकारला. आदिवासी ओळख अधिक महत्वाची मानून जेसिंताने ही भूमिका घेतली.
एकंदरीत आदिवासींना कुणीही गृहीत धरू नये हे महत्वाचे.
▪️ डॉ.संजय दाभाडे , पुणे ,
9823529505, sanjayaadim@gmail.com

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार