आदिवासी विकास विभाग कळवण चे प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी मा.श्री.विकास मीना साहेब यांच्याशी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


आदिवासी विकास विभाग कळवण चे प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी


अमोल पवार

नाशिक:- दि.३१/१२/२०२१ रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग कळवण चे प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी मा.श्री.विकास मीना साहेब यांच्याशी आदिवासी भील समाज सेवा व बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संचालक प्रवीण पवार सर, व संस्थेचे संचालक मंडळ मार्फत  बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी भील समाज सेवा व बहुउद्देशीय संस्था बागलाण महा.राज्य चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस मा.श्री.विकास मीना साहेबांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 


खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली..👇🏻👇🏻


१) शासकीय योजनांचा  लाभ मिळणेबाबत

२)शबरी घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने होणेबाबत

३)रेशनकार्ड व जातीचे दाखले मिळणेबाबत

४)आदिवासी विध्यार्थ्यांसाठी नवीन व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कोर्सेस मिळणेबाबत

५)आदिवासी पेसा क्षेत्र विस्तार करण्याबाबत

६)पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर राबवण्याबाबत

७)आदिवासींसाठी राखीव असलेला निधी संदर्भात


वरील सर्व बाबींबाबत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा कसा बसवता येईल यावर सविस्तर चर्चा केली गेली. तसेच या बाबींबाबत आदिवासिंची दिशाभूल करणारे व कागदपत्रांसाठी अवाजवी पैशांची लूटमार करणारे कर्मचारी, अधिकारी व इतर लबाड लांडगे असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल व मी स्वतः जातीने लक्ष घालून सदर प्रकरणाची  सखोल चौकशी करेल.असे मीना साहेबांनी सांगितले.




तसेच अत्यावश्यक लागणारे कागदपत्रे (जातीचे दाखले, रेशन कार्ड आदी) मी स्वतः काडून देईल असे देखील मीना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले.सदर विषयांवर चर्चा करतांना संस्थेचे संचालक मंडळ प्रवीण पवार सर, कैलास मोरे, बोरसे मच्छिंद्र, रवींद्र शिंगरे, ओंकार सोनवणे, आकाश पवार, राजू वाघ, गणेश पगारे, राजू गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले