आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
साकोली तालुका प्रतिनिधी
साकोली जवळ असलेल्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाई चा डोह येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा साकोली जिल्हा भंडारा या समितीतर्फे दुर्गाबाई डोह येथे कोरोना चा प्रसार होऊ नये यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
तसेच अंधश्रद्धा निर्मुलन जादूटोणा विरोधी कायदा याचे पत्रके सुद्धा वाटप करण्यात आली. प्रसार आणि प्रसार करण्यात आले.
जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अजुनही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे देवी अंगात येणाऱ्या महिला आहेत देवाचं नाव सांगून अंगात देवी आणतात व भक्तांना लुबाडतात. हे प्रकार सुरू असतात.
डोहात जमावबंदी असतानासुद्धा काही गावातील निवडक देव्या जमाव बंदी झुगारून मंदिरामध्ये प्रवेश केला मोठ्या प्रमाणात नाचत होते कोणत्या प्रकारचा सोशल डिस्टंस नव्हता अशा पद्धतीने नाचून दैवी चमत्कार दाखवून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. तरी पण त्यांनी आणि पोलिस विभागाने त्यांच्याकडे नजर ठेवली पाहिजे व त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तेव्हा हे चे प्रकार थांबतील अन्यथा आपल्या देशात अंधश्रद्धा वाढायला काय वेळ लागणार नाही.
काल 13 तारखेला रात्री बंद दुर्गा देव्या येत होत्या परंतु पोलिस विभागाच्या सतर्कतेमुळे त्यांना आत मध्ये येण्यास मनाई करण्यात आले त्यामुळे ते दुर्गा बाईचा डोह च्या मंदिरा पासून दोन किलोमीटर अंतरावर, तर कुणाच्या शेतामध्ये, तर कोणाच्या धर्मापुरी येथील एका घरी त्यांनी आपल्या मंडपाचे बस्तान बांधले, त्यांना पण येऊ देण्यात आले नाही. परंतु काही देव्या मात्र आत मध्ये जाण्यामध्ये यशस्वी झाल्या, त्यामुळॆ पोलीस विभागाने लक्ष दिले पाहिजे असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका संघटक कागदराव रंगारी, सचिव यशवंत उपरीकर, तालुका अध्यक्ष बी एल मेश्राम, युवा तालुका संघटक अनिल किरणापुरे, प्राचार्य घनश्याम निखाडे, प्राचार्य जितेन्द्रसिंह ठाकूर, समीर कोरे, घनश्याम निखाडे, खेमराज राऊत, इंदुलकर महिला संघटिका कल्पनाताई सांगोळे, भारती रंगारी, शुभम खांडेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांनी कोरोना चे नियम पाळून मास्कचे मोफत वाटप, जादूटोणाविरोधी कायद्याचे पत्रके येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटले व पत्रकातर्फे जनजागृती करण्याचे कार्य केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार