सटाण्यातील युवकाच्या लोकगीतांनी जनमानसावर उधळला भक्तिमावात्मक मनोरंजनाचा भंडारा.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




सटाणा (नाशिक) : मनोरंजन क्षेत्रात आपल्या गायन, रचनेच्या माध्यमातून एक नवी ओळख निर्माण करणाऱ्या महेश पाटोळे यांच्या गीतांची चर्चा सर्वत्र होत आहे.

 


            महेश पाटोळे हे मुळचे सटाणा येथिल रहिवासी ;  नाशिक जिल्ह्यातील नवोदित गीतरचनाकार-गायक असले,  तरी त्यांच्या लोकगीतांनी  जनमानसावर भक्तिमावात्मक मनोरंजनाचा भंडारा उधळला असल्याने कमी वयात सर्वश्रुत होण्याची किमया  त्यांनी साधली आहे.

                


                   वडिल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वाहक पदाच्या जबाबदारीतून सेवानिवृत्त, आई गृहिणी, भाऊ  प्राध्यापक, वहिनी खाजगी शिकवणी शिक्षिका, पत्नी गृहिणी  अशा घरातील सर्व सदस्यांच्या सहकार्याच्या जोरावर महेश पाटोळे यांनी अनेक लोकगीतं, भक्तिगीतं रचले आणि गायले आहेत.

                  

                'आला-आला गणपती वाजतं-गाजतं', 'देव मना मामलेदार', लांब-लांब गाडी म्हा बसनीयं', 'बागलाणी रॅम्प', 'माझ्या देवाच्या दोधेश्वरात', 'कांदानी चाळ म्हा', 'रथ निघाला-निघाला', अशी अनेक आहिराणी-मराठी भाषेतील लोकंगीते-भक्तिगीते रचली-गायली त्यांनी प्रदर्शित केली आहेत. अलिकडे नुकतेच खंडेराव महाराज यात्रेच्या औचित्यावर त्यांनी निर्मिलेले 'खंडेरावनी जत्रा भरनी भाक्षी डोंगर म्हा' हे आहिराणी भाषेतील 'लोक-भक्तिगीत' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

              


                   अत्यंत अल्प संसाधने, मर्यादित प्रसिद्धी माध्यमं, ग्रामिण पार्श्वभूमी या सर्व मर्यादांवर मात करत कलेची सेवा, छंदाची जोपासना करण्याचा नियतीशी करार जणू या युवकाने केला आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्या या कर्तृत्वाचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता, आदिवासी मित्र, जनसेवक प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी अभिनंदन केले. आगामी काळात आणखी दर्जेदार रचना प्रदर्शित कराव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

झाले